इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामावेळी कोलकता नाईट रायडर्स संघातील खेळाडू रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात 5 चेंडूत 5 षटकार ठोकले. रिंकूचे हे कारनामे पाहून जागतिक क्रिकेटलाही आश्चर्य वाटले होते. आता असा पराक्रम पुन्हा केव्हा पाहायला मिळेल हे माहीत नाही. पण असा पराक्रम आयपीएल संपल्यानंतर काही दिवसातच दिसून आला आहे. तर चला आपण व्हायरल झालेला व्हिडीओ पाहूयात.
खरं तर, अजमान ए-10 बॅश टूर्नामेंट मध्ये अलिशान शराफू नावाच्या फलंदाजाने 5 चेंडूत 5 षटकार मारण्याची अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये फ्युचर मॅट्रेस संघाच्या वतीने खेळत असलेल्या अलिशानने जेड गेम्स स्ट्रायकर्स संघाचा गोलंदाज रौनक पानोली केओव्हरच्या गोलंदाजीवर धमाकेदार स्टाईलमध्ये फलंदाजी केली.
फ्युचर मॅट्रेस इनिंगच्या सहाव्या षटकामध्ये रौनक गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा असे काही घडले की ज्याची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बॅटरला धावा करता आल्या नाहीत, पण त्यानंतर त्याने सलग पाच षटकार मारले. यामुळे सर्वत्र अलीशान शराफूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाच चेंडूत पाच षटकार
पहिल्या चेंडूवर धावा काढू न शकल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर या फलंदाजाने सलग 5 चेंडूत 5 षटकार मारला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अलिशान शराफूच्या खेळीच्या जोरावर फ्युचर मॅट्रेस संघाने 10 षटकांत 159/3 अशी धावसंख्या उभारली आहे. शराफूने 27 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली आहे.
Rinku Singh made it cool. Now it’s travelled across seas. Five sixes in a row in Ajman T10 ???? pic.twitter.com/ae0fWTkp1y
— FanCode (@FanCode) June 13, 2023
अलिशान शराफू आहे तरी कोण
शराफूचा जन्म भारताती आहे. तर शराफू यूएई संघाकडून खेळतो. 2020 अंडर-19 क्रिकेट विश्वचषकासाठी यूएई संघामध्ये त्याची निवड झाली. नायजेरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये शराफूने नाबाद 59 धावांची खेळी करून आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताबही देण्यात आला. आतापर्यंत त्याने यूएईसाठी 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 167 धावा, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 9 सामन्यांमध्ये 45 आणि 14 लिस्ट ए सामन्यांमध्ये 167 धावा केल्या आहेत. अलिशान शराफू हा ILT-20 मध्ये शारजाह वॉरियर्स संघाचा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारीच! ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करणार एमपीएलच्या उद्धाटन सोहळ्यात लाईव्ह परफॅार्म
KL Rahul । भारतीय संघाची चिंता दूर! प्रमुख स्पर्धेआधी सलामीवीर संघात परतण्याची पूर्ण शक्यता