---Advertisement---

जेव्हा २५ वर्षांपूर्वी संघातील सर्व खेळाडूंना मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार

On: रविवार, एप्रिल 3, 2022 10:39 AM
Test-Cricket-Lowest-Score
---Advertisement---

क्रिकेट सामन्यात साधारणतः चांगली कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. पण क्रिकेट इतिहासात एकदा असेही झाले होते की, संघातील सर्वच ११ खेळाडूंना सामानावीराचा पुरस्कार दिला होता.

अशी ही अपवादात्मक घटना घडली होती ती ३ एप्रिल १९९६ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघातील वनडे सामन्यात. या सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर या सामन्यात खेळलेल्या न्यूझीलंडच्या सर्व ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार घोषित झाला होता.

झाले असे की सामन्यानंतर पंचांनी एका खेळाडूची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यास नकार दिला. त्यामुळे संघातील सर्वच खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यातील ३ खेळाडू असेही होते, ज्यांनी दोन आकडी धावाही केल्या नव्हत्या आणि गोलंदाजीही केली नव्हती.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३५.५ षटकात १५८ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून क्रेग स्पियरमनने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी विंडीजला ४९.१ षटकात १५४ धावांवरच सर्वबाद केले.

या ११ खेळाडूंना मिळाला होता एकाच सामन्यात सामनावीर पुरस्कार
नॅथन ऍस्टल
ख्रिस केर्न्स
स्टीफन फ्लेमिंग
ली जर्मोन
ख्रिस हॅरीस
गॅव्हीन लार्सन
दीपक पटेल
क्रेग स्पीयरमन
शेन थॉमसन
रॉजर ट्वोस
जस्टीन वॉगन

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती

कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’

Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment