पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिका येथे टी20 विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी आता सर्व 20 संघांची नावे अंतिम झाली आहेत. आफ्रिका क्वालिफायरमध्ये युगांडाने विजय मिळवत अखेरची जागा आपल्या नावे केली. त्यामुळे आता या नवव्या टी20 विश्वचषकातील सर्व संघ समोर आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विट करत याबाबतची घोषणा केली.
Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men's #T20WorldCup 2024 🏆
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQ
— ICC (@ICC) November 30, 2023
आफ्रिका क्वालिफायरमध्ये युगांडाने रवांडा संघावर नऊ गडी राखून विजय मिळवत विश्वचषकातील आपला प्रवेश निश्चित केला. याच आफ्रिका क्वालिफायरमधून नामिबिया संघाने या आधीच विश्वचषकासाठी आपली जागा पक्की केली होती.
या विश्वचषकासाठीच्या पात्रतेच्या अखेरच्या तारखेपर्यंत आठ संघांनी आपली विश्वचषकातील जागा निश्चित केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, नेदरलँड्स व पाकिस्तान यांचा समावेश होता. तर, क्रमवारीतील पुढील दोन संघ म्हणून अफगाणिस्तान व बांगलादेश यांना संधी मिळाली होती. यजमान असल्याने वेस्ट इंडीज व अमेरिका हे आपोआप विश्वचषकासाठी पात्र ठरले.
विविध खंड आणि हाय झालेल्या पात्रता फेरीमध्ये युरोपातून आयर्लंड व स्कॉटलंड यांनी पात्रता मिळवली. अमेरिकन क्वालिफायरमध्ये कॅनडा व ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायरमधून पापुआ न्यू गिनी यांनी अव्वलस्थानी राहत विश्वचषकासाठी आपली जागा बनवली. आशिया क्वालिफायरमध्ये नेपाळ व ओमान पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्याने ते विश्वचषक खेळतील. अखेरच्या दोन स्थानांवर आता आफ्रिका क्वालिफायर मधून नामिबिया व युगांडा विश्वचषकात सहभागी होणार आहेत.
असे असले तरी काही अशा संघांना यावेळी विश्वचषकात सहभागी होता येणार नाही, जे सातत्याने विश्वचषकात खेळत होते. यामध्ये झिम्बाब्वे, युएई व हॉंगकॉंग दिसून येतील.
(All 20 Teams Who Qualify For 2024 T20 World Cup)
हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’