क्रिकेटटॉप बातम्या

विंडीजचा वचपा काढून मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार भारत, वाचा दुसऱ्या टी20विषयी सर्वकाही

रविवारी (दि. 06 ऑगस्ट) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून यजमान वेस्ट इंडिज संघाने 1-0ने आघाडी घेतली आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा दुसरा टी20 सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या टी20त भारतीय संघाला 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अपयश आले होते. अशात संघातील युवा खेळाडूंना दुसऱ्या टी20त चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तिलकने पदार्पणाच्यासामन्यातच सर्वाधिक 39 धावांची शानदार खेळी साकारली. तिलकने जेव्हा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याच्या चेंडूवर ऑफ साईडला षटकार मारला, तेव्हा चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण झाली होती. चला तर, दुसऱ्या सामन्याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात…

हवामान कसे असेल?
दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी सकाळच्या वेळी गयानामध्ये पावसाची शक्यता आहे. दिवसभर ढगांचे सावट असेल. दिवसा तापमान 32 अंश सेल्सिअस असू शकते. तसे पाहिले, तर सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, येथील हवामान कधीही बदलते. प्रोव्हिडन्स स्टेडिअम (Providence Stadium) येथे मागील 5 पैकी 2 टी20 सामने पावसामुळे धुवून निघाले होते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 146, 157 आणि 163 धावसंख्या उभारली होती. यापैकी दोन सामने आव्हानाचा पाठलाग करणारा संघ जिंकला होता. म्हणजेच धावांच्या पावसासोबत पाणीही बरसण्याची शक्यता आहे.

या मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 11 टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने 3 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 5 सामन्यात इतर संघाला विजय मिळाला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या मैदानावर आधी फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 आणि आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 06 ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी20 सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी20 सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी20 सामना डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या टी20 सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ऍप आणि जिओ सिनेमा ऍपवर पाहता येईल. (all about india vs west indies 2nd t20 match know here)

महत्त्वाच्या बातम्या-
एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट! पुढील पाच वर्षात भारतात होणार ‘दर्जा’ क्रिकेट
‘द हंड्रेड’मध्येही जोस बनला बॉस! उत्तुंग षटकारांनी गाजवले मॅंचेस्टरचे मैदान

Related Articles