पोचेफस्टरूम| दक्षिण आफ्रिकेत सुरु असेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा आज(9 फेब्रुवारी) अंतिम सामना सेन्वेस पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात होणार आहे.
भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकात 7 व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. याआधी खेळेलेल्या 6 अंतिम सामन्यांपैकी 4 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून विजेतेपद जिंकले आहे. तर बांगलादेश त्यांचा 19 वर्षांखालील विश्वचषकातील पहिलाच अंतिम सामना खेळणार आहे.
त्यामुळे आज भारतीय संघ 5 व्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर बांगलादेश पहिलाच विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल.
भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
सध्या सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. तर बांगलादेशने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आत्तापर्यंत 19 वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश 22 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 18 वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे तर 3 वेळा बांगलादेशने विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आज होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 चा अंतिम सामना?
– भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 चा अंतिम सामना आज(9 फेब्रुवारी) होणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना?
-भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल.
कुठे होणार आहे भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना?
-भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना , सेन्वेस पार्क, पोचेफस्टरूम येथे होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 चा अंतिम सामना?
– भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
– भारत विरुद्ध बांगलादेश संघात होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक 2020चा अंतिम सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-
भारत –
यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, टिळक वर्मा, प्रियांम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, विद्याधर पाटील, शुभंग हेगडे, सुशांत मिश्रा, कुमार कुशाग.
बांगलादेश –
परवेझ हुसेन ईमन, तंजीद हसन, महमूदुल हसन जॉय, तौहीद हृदॉय, शहादत हुसेन, अकबर अली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शमीम हुसेन, रकीबुल हसन, शॉरिफुल इस्लाम, तन्झिम हसन साकीब, हसन मुराद, मृत्तुंजय चौधरी, अविशेक दास, प्रांतिक नवरोज नबिल , शाहिन आलम