इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. एकूण 79 खेळाडू या लिलावात विकले गेले. अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. या लिलावासाठी 27 इंग्लिश खेळाडूंची अंतिम यादी तयार झालेली. त्यातील 8 खेळाडूंवर अंतिम बोली लावण्यात आली. विशेष म्हणजे हे आठही खेळाडू करोडपती बनले.
या आयपीएल लिलावात विश्वविजेता इंग्लंड संघातील खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. लिलाव सुरू झाल्यानंतर तेच चित्र दिसले. दुसरेच नाव इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याचे आले. तब्बल 13.30 कोटींची बोली लावत सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर आलेल्या सॅम करन याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम मिळवत तब्बल 18.50 कोटी रुपये कमावले. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने देखील अपेक्षा प्रमाणेच 16.50 कोटी रुपये आपल्या नावे करत चेन्नई सुपर किंग्सचा रस्ता धरला.
या सर्व प्रमुख खेळाडू नंतर युवा खेळाडूंनी देखील कोट्यावधी रुपये कमावले. फिरकीपटू आदिल रशिद दोन कोटी रुपयांसह सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाला. दुसरा युवा फलंदाज याने देखील दोन कोटी रक्कम मिळवत दिल्लीकर बनला. आतापर्यंत इंग्लंडसाठी केवळ चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला विल जॅक्स हा देखील 3.20 कोटी रुपयांची कमाई करत आरसीबी संघात दाखल झाला.
डावखुरा वेगवान गोलंदाज रिस टोप्ली यानेही 1.90 कोटींंसह आरसीबीमध्ये स्थान मिळवले. लिलावाच्या पहिल्या फेरीत विकला न गेलेला इंग्लंडचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज जो रूट याला देखील राजस्थान रॉयल्सने अंतिम ता एक कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघाचा भाग बनवले. हे खेळाडू विकले गेले असतानाच ओव्हरटन बंधू, जो क्लार्क व रेहान अहमद या खेळाडूंच्या पदरी निराशा पडली.
(All England Cricketer Get Crores In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे बरं नाही! चूक स्वत:ची अन् राग दुसऱ्यावर, विराटचा पंतवर आगपाखड करणारा व्हिडिओ पाहाच
IPL AUCTION: तडाखेबंद फलंदाज आणि मिस्ट्री स्पिनर! काश्मीरचा ‘फुल पॅकेज’ विवरांत बनला करोडपती