इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अनेक खेळाडू आपला दमदार खेळ दाखवत आहेत. तसेच, ते आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचही पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र, काही सामन्यात त्यांना ते शक्य होत नाही. असेच काहीसे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलबाबत आहे. कोलकाता संघ रसेलवर खूप जास्त अवलंबून असल्याचे अनेक दिग्गज खेळाडूंचे मत आहे. त्यात रवी शास्त्री यांचाही समावेश आहे. शास्त्रींनी कोलकाता संघावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कोलकाता ही रसेलवर अवलंबून असल्याचे सांगितले आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा असा विश्वास आहे की, आंद्रे रसेल (Andre Russell) याने यंदाच्या हंगामात आपली भूमिका पार पाडली आहे. नेहमीच संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि गरज पडेल तिथे चांगली कामगिरी करण्यासाठी रसेल काही सुपरमॅन नाहीये.
शास्त्री यांनी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सोमवारी (दि. ०९ मे) होणाऱ्या सामन्यापूर्वी आपले मत मांडले. ते म्हणाले की, दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणारा संघ रसेलवर गरजेपेक्षा जास्तच अवलंबून आहे. कोलकाता संघ यावेळी खूपच संकटातून जाताना दिसत आहे. मागील सात सामने त्यांनी गमावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाला मागील सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ७५ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात रसेलने कमालीची फलंदाजी केली होती. त्याने फक्त १९ चेंडूत ४५ धावा चोपल्या होत्या. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज खास कामगिरी करण्यात अपयशी ठरले आणि परिणामी संघाला सामना गमवावा लागला.
माध्यमांशी बोलताना शास्त्रींना विचारण्यात आले की, नक्की कोलकातासाठी रसेल किती उपयोगी खेळाडू आहे? यावर उत्तर देताना शास्त्री म्हणाले की, “रसेल कोलकातासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, संघाचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे कठीण दिसत आहे. रसेलने या हंगामात आपली भूमिका पार पाडली आहे. इतर खेळाडूंनी आता आपला खेळ दाखवला पाहिजे. तो सुपरमॅन नाहीये, जो प्रत्येक सामन्यात तुम्ही विजय मिळवून देईल. इतर खेलाडूंनाही काहीतरी पावलं उचलावी लागतील. रसेलला जी धमाकेदार कामगिरी करायची होती, ती त्याने खूप आधीच केली आहे.”
आंद्रे रसेलची गणना जगभरातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. तो त्याच्या खेळामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. रसेलने या हंगामात ११ सामन्यात ३८.८६च्या सरासरीने २७२ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजीत त्याने १०.१३च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट्स घेतल्या आहेत. असे असूनही कोलकाताने ११ सामन्यांपैकी फक्त ४ सामने जिंकलेत, तर उर्वरित ७ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसलाय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आंद्रे रसेलची आयपीएल कारकीर्द
आंद्रे रसेलच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ९५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३०.३४च्या सरासरीने १९७२ धावा चोपल्या आहेत. यामध्ये १० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ९.१३च्या इकॉनॉमी रेटने ८४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video
‘द वाॅल’ राहुल द्रविड चक्क दिसणार भाजपच्या मंचावर, पाहा काय आहे नक्की प्रकरण?