‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, अशी एक म्हण मराठीत आहे. याच म्हणीचा अर्थ खरा ठरवत मध्य प्रदेशचा दिव्यांग क्रिकेटर माखनसिंह राजपूतने कौतुकास्पद यश मिळविले आहे. केवळ एका हाताने क्रिकेट खेळणाऱ्या माखनची निवड दुबईमध्ये होणार्या दिव्यांग प्रीमियर लीगसाठी झाली आहे. या लीगमध्ये तो मध्य प्रदेशच्या संघाकडून खेळताना दिसेल.
क्रिकेटर होण्याचं स्वप्न
माखनसिंह राजपूत मूळचा मध्य प्रदेशातील सारंगपूर जिल्ह्यातील तलेनी गावाचा रहिवासी आहे. लहानपणापासून क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघत माखन मोठा झाला. त्याला जन्मापासूनच डावा हात नाही आहे. मात्र, क्रिकेटच्या वेडाने त्याला कधीच त्याच्या अपंगत्वाची जाणीव झाली नाही.
या स्वप्नासाठी माखनने २० वर्षे कठोर मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ म्हणून २०१९ साली मध्य प्रदेशच्या दिव्यांग क्रिकेट संघात त्याची निवड झाली. मध्य प्रदेशच्या दिव्यांग संघाचे प्रशिक्षक राकेश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली माखन आता नियमित सराव करतो. तडाखेबाज फलंदाजीसह तो उपयुक्त गोलंदाजी देखील करतो.
प्रवास नव्हता सोप्पा
क्रिकेटर होण्याच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागल्याचेही माखनसिंह राजपूत सांगतो. सुरुवातीला माखन गावात मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. मात्र, खेळ पाहून मित्रांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे नंतर उज्जैनला स्थायिक झाला. तिथे माधवची कॉलेजच्या मैदानावर क्रिकेटचा सराव करण्याची इच्छा होती, परंतु एक हात नसल्याने त्यांनी परवानगी नाकारली. त्यानंतरही माखनने हार न मानता शक्य त्या प्रकारे सराव चालू ठेवला. सुदैवाने बीसीसीआयने मध्य प्रदेशात दिव्यांग क्रिकेटची सुरुवात केली. त्यात माखनने केलेल्या अष्टपैलू खेळामुळे त्याची मध्य प्रदेशच्या दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली.
नशिबाला दोष देऊ नका
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने इतर दिव्यांग लोकांना संदेश देताना माखनसिंह राजपूत म्हणाला, “आपल्या वाटेला आलेल्या परिस्थितीसाठी निसर्गाला दोष देत बसू नका. त्याऐवजी प्रामाणिकपणे मेहनत करून स्वतःला सिद्ध करा. ध्येयाप्रती तुमची निष्ठा जर सच्ची असेल, तर तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव