घर ही एक अशी जागा असते, जिथे आपण सर्वात चांगला वेळ घालवतो. त्यामुळे अगदी सामन्य व्यक्ती असो वा मोठे सेलिब्रिटी प्रत्येकजण आपापल्या परीने आपले घर सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. अगदी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, अनेकांची घरे त्यांच्याप्रमाणे स्टायलिश आहेत. काही खेळाडूंच्या घरांना पाहताच क्षणी आपोआप आपल्या तोंडून ‘व्वा भावा घर असावं तर असं!’, हे शब्द निघतात. कोट्यावधी क्रिकेटरसिकांचा आवडता क्रिकेटपटू अर्थातच भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी याचे घरही खूपच सुंदर आणि मनाला भुरळ पाडावे असे आहे.
माजी भारतीय यष्टीरक्षक धोनीचे (MS Dhoni) अतिशय सुंदर असे घर त्याचे राहते शहर रांचीमध्ये आहे. साधारणत: ७ एकर जागेवर हे घर उभारण्यात आले आहे. धोनीने स्वत: आपला बंगला डिझाईन केला आहे. या घरात त्याने मोठ्या हवेशीर खिडक्या बसवल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BWjb9sHni5u/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/Bq426bHFuLd/?utm_source=ig_web_button_share_sheet
तसेच बाईक्सची आवड असलेल्या धोनीने त्याच्या बंगल्यात गाड्या पार्क करण्यासाठी खास जागा देखील ठेवली आहे. तेथे धोनीच्या बाईक्स व कार असतात. कधी-कधी कुटुबीयांसोबत वेळ घालवता यावा यासाठी धोनीने त्याच्या बंगल्यात एक मोठा जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि एक सुंदर बाग बनवली आहे. याशिवाय इनडोअर खेळ खेळता यावे म्हणून मोकळी जागाही ठेवण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/B5E5bqQHvc_/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CCVDg3in64h/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/BbejRWFn1T-/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनीच्या रांचीतील या आलिशान घराचे नाव कैलाशपती असे आहे. हे घर बांधण्यासाठी त्याला ३ वर्षे लागली होती. रांचीमधील हामरु रोडवर धोनीचे जुने घर होते. तेथून या ठिकाणी येण्यासाठी धोनीला २० मिनीटे लागतात.
https://www.instagram.com/p/Bl5TeIiA5a_/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/BmvM8ypHbEe/?utm_source=ig_web_button_share_sheet
परंतु मुळात रांचीवासी असलेल्या धोनीचे दुसऱ्या शहरातही घर आहे. होय. तेही इथे तिथे नसून तुमच्या-आमच्या पुणे शहरात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेल्या धोनीला बऱ्याचदा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अथवा आयपीएल सामन्यासाठी संघासोबत पुणे येथील गहुंजे स्टेडियमला यावे लागायचे. असे म्हटले जाते की, क्रिकेटच्या निमित्ताने सतत पुणे वारी करावी लागणाऱ्या धोनीला पिंपरी-चिंचवडमधील गहुंजे स्टेडियम परिसरातील निसर्गरम्य वातावरणाने प्रभावित केले होते. त्यामुळे त्याने या परिसरात एक घेण्याचे ठरवले.

त्यावेळी गहुंजे परिसरातील किवळे येथे एसताडो प्रेसिडेंशियल सोसायटी (Estado Presidential) प्रोजेक्टचे काम सुरु होते. धोनीने याच सोसायटीमध्ये एक फ्लॅट विकत घेतला. यानंतर धोनी जेव्हाही पुण्याच्या दौऱ्यावर येतो, तेव्हा तो याच घरात राहतो. येथील रहिवासी सांगतात जेव्हाही धोनी येथे काही दिवसांच्या मुक्कामासाठी येत असे तेव्हा पहाटे ५ वाजता तो जॉगिंगसाठी बाहेर पडायचा. कधी-कधी छतावरही नेट प्रॅक्टिस करताना त्याला अनेक वेळा पाहण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यानंतर विराट स्वत: ‘या’ धुरंधराकडे भारताचे नेतृत्त्वपद सोपवणार, माजी खेळाडूची भविष्यवाणी
किती ते प्रेम! केएल राहुलला पुन्हा फिट पाहून प्रेयसी अति आनंदित, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
‘आई शप्पथ तो बाद आहे’; जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाजाने पंचांकडे केला होता बालहट्ट






