fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संघाचा डाव सावरत असलेले दिल्लीचे २ मोहरे झाले सलग बाद, पण ‘हा’ खेळाडू ठरला गेमचेंजर

All Updates Of Delhi Capitals First Inning

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात येत आहे.

या सामन्यापुर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. गतवर्षीची ठरलेली शिखर धवन आणि पृथ्वी शॉची सलामीची जोडी फलंदाजीसाठी मैदानावर आली. पण दूसऱ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. दूसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर धवन शून्य धावेवर धावबाद झाला.

धवन नंतर चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिल्लीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शॉ आणि सहाव्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे चौथ्या षटकापर्यंत दिल्लीचा स्कोर ३ बाद १३ धावा इतकाच झाला.

त्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. दोघांनीही संघाचा डाव सावरत १३व्या षटकापर्यंत ६३ धावांची दमदार भागिदारी केली. परंतु पुढील षटकातील सहाव्या चेंडूवर युवा गोलंदाज रवि बिश्नोईने पंतला त्रिफळाचीत केले. त्यामुळे पंत २९ चेंडूंत फक्त ३१ धावा करत पव्हेलियनला परतला.

पंतपाठोपाठ शमीने अय्यरलाही झेलबाद करत डाव आपल्या बाजूने करुन घेतला. अय्यर ३२ चेंडूंवर ३९ धावा करत क्रिस जॉर्डनच्या हातून झेलबाद झाला. अशाप्रकारे दिल्लीचा डाव सावरत असणाऱ्या २ दमदार फलंदाजांना पंजाबच्या गोलंदाजाने एकापाठोपाठ बाद केले.

पण पहिल्यांदा दिल्लीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिसने ६व्या क्रमांकावर फलंदाजीला येत दमदार प्रदर्शन केले. त्याने केवळ २१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार मारत ५३ धावांची अफलातून खेळी केली आणि सामन्याचा कायापालट केला.

त्यामुळे दिल्लीचा डाव २० षटकात ८ विकेट्स गमावत १५७ धावांवर संपला. दरम्यान शमीने गोलंदाजी करताना सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर शेल्ड कॉट्रेलने २ आणि बिश्नोईने १ विकेट चटकावली. आता पंजाब दिल्लीच्या १५८ धावांचे आव्हान पूर्ण करेल का नाही?, हे पाहणे रोमांचक ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-षटकार- चौकारांची बरसात करत मार्कस स्टोयनीसने केला अजब कारनामा

-इकडे आयपीएल सुरु असताना ‘त्याने’ तिकडे क्रिकेटमध्येच रचला अनोखा इतिहास

-पहिल्या सामन्यातील ‘किंग’ समजल्या जाणाऱ्या खेळाडूला पंजाबने दाखवला बाहेरचा रस्ता

ट्रेंडिंग लेख-

-यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू

-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान

-वाढदिवस विशेष: राशिद खान विषयी माहित नसलेल्या ५ खास गोष्टी…


Previous Post

पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू अनिल दलपत

Next Post

आयपीएल इतिहासातील ३ फलंदाज, ज्यांनी डावातील शेवटच्या ३ षटकात कुटल्यात सर्वाधिक धावा

Related Posts

क्रिकेट

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

January 23, 2021
क्रिकेट

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल इतिहासातील ३ फलंदाज, ज्यांनी डावातील शेवटच्या ३ षटकात कुटल्यात सर्वाधिक धावा

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals

राजस्थान रॉयल्सला बसला जबरदस्त धक्का; हा खेळाडू सीएसकेविरुद्ध खेळणार नाही सामना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.