जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतावर भारी पडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 318 धावांनी आघाडीवर आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनचा महत्वाचा खेळाडू आहे. स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होती.
भारत आणि ऑस्ट्रेलियन संघातील हा महत्वाचा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत अगदी पहिल्या दिवसापासून रंगात आली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 भाद 327 धावा केल्या होत्या. दुसऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांकडून चांगल्या आणि संयमी खेळीची अपेक्षा होती. मात्र, फलंदाज तसे करताना दिसले नाहीत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 5 बाद 151 धावा केल्या. परिणामी भारतीय संघ विजयापासून बांल जाताना दिसत आहे.
उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलिय फलंदाज आणि गोलंदाज आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर वाहवाह लुटत आहेत. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर नेहमीप्रमाणे चाहत्याचे विशेष लक्ष होते. अशातच स्टार्कची पत्नी एलिसा हिली देखील मैदानात आप्याचे पाहायला मिळाले. एलिसा हिलीचे मैदानातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. फोटोत दिसते की, हिलीने गुलाबी रंगाच्या ब्लेझर आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातला आहे.
Queen Alyssa Healy watching WTC final from the stand ????❤️ pic.twitter.com/1yn3Z8JOJY
— MONK. (@Itsmonk_45) June 8, 2023
Talk about a power couple on and off the field! Mitchell Starc’s wife & our WARRIORZ ????????Alyssa Healy, Australia’s sensational wicket-keeper batter, is at Kennington Oval to support her hubby ???????? #INDvsAUS #WTCFinal2023 #WTC23Final #INDvAUS #RohitSharma #ViratKohli #WTC23 pic.twitter.com/QF2Kf7uRwy
— UP WARRIORZ ARMY #Cheer4women’s (@womenscric) June 8, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताचा एकही फळंदाज अद्याप अर्धशतक करू शकला नाहीये. ऑस्ट्रेलियासाठी स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी वैयक्तिक शतके केली. सोबतच दोघांमध्ये 250 पेक्षा जास्त धावांची भागीदारी देखील झाली. स्मिथने 121, तर हेडने 163 धावांची खेली केली. गोलंदाजी विभागात ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड, कॅमरून ग्रीन आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Alyssa Healy attends London’s Oval Stadium to cheer on Mitchell Starc)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video
एका कॅप्टनने काढला दुसऱ्या कॅप्टनचा काटा, रोहितने स्वत:पेक्षा जास्त पंचांवर दाखवला विश्वास, पाहा Video