---Advertisement---

तिच्या एका ट्विटने पुरुष क्रिकेटपटूंना जमीनीवर आणले…

---Advertisement---

जगात सध्या कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्रीडा स्पर्धांवर होत आहे. अनेक स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थित खेळवल्या जात आहेत. यात ऑस्ट्रिलिया विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचाही समावेश आहे.

याबद्दल ऑस्ट्रेलिया महिला संघाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिलीने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

झाले असे की रविवारी(८ मार्च) महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 86,174 प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यानंतर आज(१३ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड पुरुष संघात सिडनी येथे पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोरोना व्हायरसमुळे एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता.

याबद्दल एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने ट्विट केले की रविवारी ‘त्यांच्यासाठी (महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी) ८६,७१४ (८६,१७४) प्रेक्षक  उपस्थित होते, ती चमत्कारीक वेळ होती. पण त्यानंतर लगेचच आठवड्यानंतर प्रेक्षक संख्या शून्यावर आली.’

यावर हिलीने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले, ‘ज्याप्रमाणे पुरुष क्रिकेटपटू अनुभव घेतात, तसा अनुभव आम्ही या आठवड्यात घेतला आणि आता ते आम्ही(महिला क्रिकेटपटू) जसा अनुभव घेतो तशी परिस्थिती अनुभवत आहेत.’

रविवारी भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडलेला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून ५ व्यांदा विश्वविजेतेपद मिळवले होते. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात हेलीने महत्त्वाचा वाटा उचलला होता. तिने ३९ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर ऑस्ट्रेलियाच्या त्या खेळाडूला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला!

बीसीसीआयचा मोठा निर्णय; आयपीएल २०२० ला स्थगिती

संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---