आयपीएल २०२२ मध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकणारा संघ चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा फलंदाज अंबती रायुडू सध्या चर्चेत आहे. शनिवारी (१४ मे) रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याचे ट्वीटर पोस्टच्या माध्यमांतून घोषित केले. पण काही वेळानंतर त्याने हे ट्वीट डिलिट केले. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या माहितीनुसार रायुडू निवृत्ती घेणार नाहीये. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा एखाद्या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आपण या लेखात अशाच पाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी रायुडूप्रमाणेच निवृत्तीचा निर्णय बदलला होता.
१. शाहिद आफ्रिदी –
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिन अफ्रिदीचा उल्लेख निवृत्ती घेऊन पुन्हा पुनरागमन करणाऱ्यांच्या यादीत पहिल्यांदा करावा लागेल. अफ्रिदीने एकापेक्षा अधिक वेळा निवृत्तीचा निर्णय घेतला, पण पुन्हा मैदानात पुनरागमन केले. त्याने २०१० साली निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर २०११ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने पराभूत केल्यानंतर देखील निवृत्ती घेतली होती, पण पुन्हा स्वतःचा हा निर्णय बदलला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२. जवागल श्रीनाथ –
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने देखील निवृत्तीनंतर संघात पुनरागमन केले होते. त्याने २००२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण २००३ साली खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. त्याच्या पुनरागमनामध्ये सौरव गांगुलीची महत्वाची भूमिका राहिली होती. गांगुलीनेच हा निर्णय घेण्यासाठी त्याचे मन वळवले होते.
३. ब्रँडन टेलर –
ब्रँडन टेलर जिम्बाब्वे संघाचा एक दिग्गज खेळाडू राहिला आहे आणि तो देखील या यादीत सहभागी आहे. त्याने २०१५ विश्वचषकात भारताविरुद्धचा सामना खेळला आणि निवृत्तीची घोषणा केला. हा निवृत्तीचा निर्णय त्याला मनाविरुद्ध घ्यावा लागला होता. कारण काउंटी संघ नाटिंघमशायरसोबत त्याची कोल्पॅक डील होती. ही डील पूर्ण केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि जिम्बाब्वे संघाला अनेक सामने जिंकवून दिले.
४. कार्ल हुपर –
कार्ल हुपर वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार होते. त्यांनी १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु २००१ मध्ये त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यांनी वेस्ट इंडीज संघासाठी १०२ कसोटी, तर २२७ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
५. जावेद मियांदाद –
पाकिस्तान संघाचे माजी यष्टीरक्षक जावेद मियांदाद देखील निवृत्तीनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्यांनी १९९६ विश्वचषकाच्या आधी निवृत्तीची घोषणा केली होती. पण निवृत्तीच्या अवघ्या १० दिवसांनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांच्या सांगण्यावरून मियांदादने हा निर्णय घेतला होता. त्यांनी पाकिस्तासाठी तब्बल ६ विश्वचषक खेळले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
उमरान मलिकच्या वडिलांना आहे विश्वास, लवकरच भारतीय संघासाठी खेळेल मुलगा; वाचा संपूर्ण वक्तव्य
आय ऍम जोकिंग! काही मिनिटांतच निवृत्तीच्या निर्णयावरून रायुडूचा यूटर्न, नेटकऱ्यांनी केले भलतेच ट्रोल