भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू याने नुकत्याच दिलेल्या एका मुखतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर निशाणा साधला. रायुडू भारतीय क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू आहे. पण बहुतांश वेळा मोक्याच्या वेळी त्याला संघातून बाहेर बसवले गेले. 2019 वनडे विश्वचषकात देखील असेच काहीसे घडले होते. याच पार्श्वभूमीवर रायुडूने नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघ आयसीसीच्या 2019 वनडे विश्वचषकात 9 पैकी 7 सामने जिंकला होता आणि लीग स्टेजमद्ये पहिल्या क्रमांकावर होता. असे असले तरी, अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याला संघात न घेतल्यामुळे त्यावेळी चांगलाच वाद झाला. त्यावेळी रायुडूच्या जागी विजय शंकर याला निवडर्त्यांनी संधी दिली होती. संघात निवड न झाल्यानंतर रायुडूने एक मजेशीर ट्वीट देखील केले, जो चांगलेच व्हायरल झाले होते.
संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी त्यावेळी रायुडूवर दाखवलेला अविश्वास अजूनही त्याच्या मनात घर करून बसल्याचे पाहायला मिळते. नुकतीच रायुडूने एक मुलाखत दिली. त्यात तो 2019 विश्वचषकात खेळण्याची संधी न मिळाल्यावद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटल्याप्रमाणे, विश्वचषकाच्या एक वर्ष आधीच बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला शब्द दिला गेला होता की, आगामी विश्वचषक खेळण्याची संधी मिळेले. रायुडू मुलाखतीत म्हणाला, “2018 साली बीसीसीआय अधिकारी मला म्हणाले होते की, 2019 वनडे विस्वचषकासाठी तयार रहा.” असे असले तरी, रायुडूला ऐन वेळी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
वनडे विश्वचषकासाठी 15 एप्रिल 2019 रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे 16 एप्रिल 2019 रोजी रायुडूने एक खास ट्वीट करत निवडकर्त्यांवर निशाणा साधला होता. त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, “विश्वचषक पाहण्यासाठी आताच 3डी गॉगल्स मागवले आहेत.” रायुडूची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून त्याला चाहत्यांकडून पाठिंबा देखील मिळाला होता.
Just Ordered a new set of 3d glasses to watch the world cup ????????..
— ATR (@RayuduAmbati) April 16, 2019
दरम्यान, आयपीएल 2023 मध्येही रायुडू चांगलाच चर्चेत राहिला. त्याने अंतिम सामन्यात सीएसकेसाठी 8 चेडूत 19 धावा कुटल्या होत्या. गुजरात टायटन्सविरुद्ध रायुडूने केलेली ही खेळी पुढे सीएसकेच्या विजयासाठी महत्वाची ठरली. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिली. कारकिर्दीत सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर रायुडू क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त देखील झाला. मागच्या काही दिवसांपासून रायुडू राजकारणात पदार्पण करणार असल्याच्याही चर्चा आहेत. (Ambati Rayudu accuses BCCI of keeping him out of 2019 World Cup)
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
VIDEO । एका चेंडूत खर्च केल्या 18 धावा, भारतीय गोलंदाजाचा नकोसा विक्रम!