चेन्नई सुपर किंग्जचा मध्यक्रमातील फलंदाज अंबाती रायुडूने शनिवारी (१४ मे) अचानक क्रिकेट जगताला धक्का दिली. रायुडूने अचानक ट्वीट करून तो आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. परंतु काही वेळातच त्याने हे ट्वीट डिलिट केले. त्याच्या या ट्वीटनंतर चाहत्यांमध्ये त्याच्या निवृत्तीविषयी चर्चा रंगल्या. त्याने ही पोस्ट करून नंतर डिलिट केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अनेक मजेशीर मिम्स व्हायरल होत आहेत.
आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ चेन्नई सुपर किंग्जला चालू हंगामात अनेक मोठे झटके मिळाले आहेत. त्यांच्या वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे हंगामात सहभागी होऊ शकला नाही. त्यानंतर एमएस धोनीने हंगामाची सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपद सोडले होते आणि रवींद्र जडेजाकडे नेतृत्वाची जबाबादारी सोपवली गेली होती. मात्र, जडेजाला ही जबाबदारी पेलता आली नाही आणि धोनी पुन्हा संघाचा कर्णधार बनला. यादरम्यान संघाचे प्रदर्शन मात्र खूपच खालावले. अशातच आता संघाचा प्रमुख खेळाडू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) जर आयपीएलमधून निवृत्ती घेणार असेल, तर हा संघासाठी खरोखर मोठा झटका असेल.
रायुडूने आधी निवृत्तीचे ट्वीट केले आणि काहीच वेळात हे ट्वीट डिलिट केल्यामुळे नेटकरी सक्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर रायडूला चांगलेच ट्रोल केले जात आहे. रायुडूच्या डिलिट केलेल्या ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये एकप्रकारे संभ्रम तयार झाला आहे आणि ते देखील व्यक्त होत आहेत.
रायुडूच्या ट्वीटनंतर नेटकरी सक्रिय
Thank You Champion 🏆🙏 #ambatirayudu #Rayudu #CSK #Dhoni pic.twitter.com/CuqrCHzDVs
— Priyanshu sharma (@priyanshu_077) May 14, 2022
#CSK players after every 2 days#ambatirayudu pic.twitter.com/Jz4YXUi7Uh
— Rishabh (@Pun_Intended___) May 14, 2022
#ambatirayudu
Rayudu deletes the retirement tweet.Nobody:
VijayShankar: pic.twitter.com/NiWLSdNuOb
— वि. जे. (@be_marwadi) May 14, 2022
After Ambati Rayudu deleting he's Retirement tweet. Csk dressing room right now. 😅😂#ambatirayudu #CSK #IPL pic.twitter.com/igcd2WS9Y7
— Vicky💎 (@vickyGujrathi1) May 14, 2022
https://twitter.com/brb_memes7/status/1525397856743739392?s=20&t=cAHNjR50cD1FFvAU3D8HJA
#ambatirayudu #CSK #CricketTwitter
Ambati Rayudu posts IPL retirement tweet then "REALISES" that he can become CSK captain next season: pic.twitter.com/dWVd2R2IOl
— Hemant (@SportsCuppa) May 14, 2022
#AmbatiRayudu to his retirement: pic.twitter.com/jsRWEJOIJn
— Anonymous9726 (@Anonymous97261) May 14, 2022
https://twitter.com/Vaibhav_m85/status/1525384429916413952?s=20&t=fwgyJXOgOy6lLvQ3GMSIOg
https://twitter.com/notsodumb_/status/1525389214744948738?s=20&t=dBlUvUvAnw3LT8c_i0Pgww
#ambatirayudu me after getting the news of ambati rayudu retirement from CSK #CSK pic.twitter.com/rNpdTH5LWZ
— Krishna Aggarwal (@Krishna55371428) May 14, 2022
This is what happened 😂#CSK𓃬 #IPL2022 #AmbatiRayudu #original pic.twitter.com/kd6YVaTXoX
— 😊 Hiteshsinh Bhoiraj 😊 (@HiteshsinhBhoi1) May 14, 2022
Hopefully Rayudu is not retiring.
Long way to go. #CSK𓃬#ambatirayudu pic.twitter.com/NbSwRMbFl7— Shubham Mishra (@lmSmishra) May 14, 2022
अंबाती रायुडूने या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. मी इथे खूप चांगला वेळ घालवला आहे आणि १३ वर्षांपर्यंत दोन महान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या अप्रतिम प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जला इमानदारीने धन्यवाद म्हणायला आवडेल.” रायडूने निवृत्तीचे हे ट्वीट डिलिट केल्यामुळे जरी संभ्रम निर्माण झाला असला, तरी सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र याबाबतीत महत्वाची माहिती दिली आह. विश्वनाथनने सांगितल्याप्रमाणे रायुडू निवृत्ती घेत नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या विजयानंतरही मयंक दिसला नाराज, विराटने काढली समजूत; पाहा दोघांमधील संभाषणाचा Video
“धोनी जर खेळणार नसेल, तर त्याने मेंटर किंवा कोच व्हावं”
पाटिदारच्या गगनचुंबी षटकाराने राडा, स्टेडिअममध्ये बसलेल्या काकांचं फुटलं डोकं, Video व्हायरल