भारतात सध्या अनेक गुणवान क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहेत, तसेत काही अनुभवी खेळाडू स्वत:ला सिद्ध करत आहेत. यात अंबाती रायडूचाही समावेश आहे. आता रायडूने (Ambati Rayudu) आणखी ३ वर्षे खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे २०१९ साली झालेल्या वनडे विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात अंबाती रायडूला निवड समीतीने स्थान दिले नव्हते, त्यामुळे रायडूने तडकाफडली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, काही कालावधीतच त्याने आपलं मन बदलले आणि निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आता अंबाती रायडूने अजून ३ वर्षे खेळायचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्रप्रदेशकडून खेळताना रायडूने दमदार कामगिरी केली आहे.
रायडू म्हणाला की, “जोपर्यंत मी फॉर्ममध्ये आहे आणि तंदुरुस्त आहे, तोपर्यंत मला खेळत राहायचे आहे. मी पुढील तीन वर्षाच्या सत्रांची तयारी करत आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. मी नुकतीच विजय हजारे ट्रॉफी खेळलो, ज्यामध्ये मी सहा दिवसात पाच एकदिवसीय सामने खेळले. मी तंदुरुस्त आहे आणि पुढील तीन वर्षे तसाच राहण्याची अशा आहे.”
अधिक वाचा – अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू
रायडू म्हणत आहे की, त्याला किमान पुढील तीन वर्षे खेळायचे आहे आणि तो इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी तयारी करत आहे.
व्हिडिओ पाहा – करिअरच्या लास्ट बॉलवर फलंदाजांना त्रिफळाचित करणारे गोलंदाज
चेन्नई सुपर किंग्जकडून पुन्हा खेळण्याची इच्छा
याबरोबरच रायडूने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचेही आभार मानले. गेल्या काही हंगामात रायडू सीएसकेकडून खेळला आहे. तो म्हणाला, “माझे पुनरागमन चेन्नई सुपर किंग्जला समर्पित होते. त्या काळात त्यांनी मला ज्या प्रकारे मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी त्यांच्याबरोबर आत्तापर्यंत दोन आयपीएल जिंकले आहेत आणि एक अंतिम सामना खेळलो आहे. धोनी भाईने माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली. त्याचा केवळ माझ्यावरच नाही, तर प्रत्येक खेळाडूवर प्रभाव आहे आणि तो सर्वांमधून सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणतो.”
रायडू पुढे म्हणाला, “त्यामुळेच तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. संधी मिळाल्यावर मला पुन्हा चेन्नई कडून खेळायला आवडेल. आत्तापर्यंत मला कल्पना नाही, परंतु अशा आहे की चेन्नई मला पुन्हा संधी देईल.”
चेन्नईने मेगा लिलावपूर्वी संघात एमएस धोनी, रवींंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड आणि मोईन आली यांना कायम ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? भज्जीने विराटला म्हटले होते दुसरी आई? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
दुसऱ्या डावात बाद होऊन माघारी परतल्यानंतर विराटने दिली ‘अशी’ रिॲक्शन, फोटो व्हायरल
“यॉर्कर किंग!” जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ‘त्या’ चेंडूची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा