इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १५ वा (indian premier league ) हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. या स्पर्धेत ८ नव्हे तर १० संघ विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर आयपीएल स्पर्धेचा इतिहास पाहिला तर, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघाने ५ वेळेस जेतेपद मिळवले आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) संघाने ४ वेळेस जेतेपद मिळवले आहे. या दोन्ही संघात अनेक असे खेळाडू होऊन गेले जे स्वतःच्या जीवावर सामना जिंकून द्यायचे. दरम्यान या दोन्ही संघांमध्ये एक असा खेळाडू होता, ज्याने दोन्ही संघांना जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
गतवर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केलेला अंबाती रायुडू हा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाडूने ५ वेळेस (२०१३,२०१३,२०१५ मुंबई इंडियन्स आणि २०१८, २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज) आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्यात अंबाती रायुडूने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेतील १३ डावात १५१. १७ च्या स्ट्राइक रेटने २५६ धावा केल्या होता. स्पर्धेच्या १४ व्या हंगामात स्ट्राइक रेटच्या बाबतीत तो ७ व्या क्रमांकावर होता.
अंतिम षटकांमध्ये घातक फलंदाजी
अंबाती रायुडूकडे अंतिम षटकांमध्ये जलद गतीने फलंदाजी करण्याची क्षमता आहे. २०२१ मध्ये झालेल्या हंगामात त्याने १६ ते २० षटकांमध्ये ६४ चेंडूंमध्ये १२८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि १० षटकार देखील मारले होते.
आयपीएल स्पर्धेत लवकरच करणार ४००० धावा
अंबाती रायुडू आयपीएल स्पर्धेत ४ हजार धावांचा डोंगर उभारण्यापासून काही धावा दूर आहे. त्याला ४ हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ८४ धावांची आवश्यकता आहे. यादरम्यान त्याने २१ अर्धशतक आणि ३५ वेळेस ३० पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान त्याने १४९ षटकार आणि ३२४ चौकार मारले आहेत.
मुंबई शसाठी देखील केली आहे अप्रतिम कामगिरी
चेन्नई सुपर किंग्जसह मुंबई इंडियन्स संघासाठी देखील अंबाती रायुडूने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने या संघासाठी १०७ डावात २४१७ धावा केल्या आहेत. या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज आहे. त्याने २०१० पासून ते २०१७ पर्यंत या संघाचे प्रतिनिधित्व केले.
महत्वाच्या बातम्या :
‘किंग कोहली’चा १०० वा कसोटी सामना असेल खास! जाणून घ्या नेमक कारण
आयपीएल लिलावात नाव येताच ‘या’ फलंदाजाने पाडला धावांचा पाऊस; फ्रॅंचाईजींचे वेधले लक्ष
कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…