भारतीय संघाचा श्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जातील. कोविडमुळे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. तत्पूर्वी, या सामन्यांचे प्रसारण करणाऱ्या सोनी वाहिनीने या दौऱ्यासाठीच्या समालोचकांची नावे घोषित केली आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अमित मिश्रा हा प्रथमच समालोचन करताना दिसेल.
‘हे’ असणार प्रमुख समालोचक
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड आणि भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिक हे दोघे मैदानावरून सामन्याचे वार्तांकन करतील. कॉमेंट्री पॅनेलमधील संजय मांजरेकर हे सर्वात हाय प्रोफाइल नाव असून, अजित आगरकर आणि अजय जडेजा हे इंग्लिश कॉमेंट्री टीममध्ये असतील. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा प्रथमच कॉमेंट्री करताना दिसेल. मिश्रा हिंदी कॉमेंट्री टीमचा भाग असेल.
वेगवेगळ्या स्थितीत आहेत दोन्ही संघ
वनडे मालिका १३ ते १८ जुलै दरम्यान होईल आणि त्यानंतर २१ ते २५ जुलै दरम्यान टी२० सामने होणार आहेत. श्रीलंकेचा संघ सध्या इंग्लंडमध्ये असून तेथे ते यजमानांविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहेत. कुसल परेराच्या नेतृत्वातील श्रीलंका संघाने टी२० मालिकेत क्लिन स्विप स्वीकारला तर, वनडे मालिकेत ते २-० ने पिछाडीवर आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होणारी मालिका दोन्ही संघांसाठी विविध आघाड्यांवर महत्त्वपूर्ण असणार आहे. भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे भारताचा संघ शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेत खेळेल. दुसरीकडे श्रीलंका देखील आपल्या खेळाडूंना वार्षिक करारावर स्वाक्षरी लागू करण्यासाठी राजी करू शकला नाही. प्रमुख खेळाडूंनी मालिका खेळण्यास नकार दिल्यास श्रीलंकेचा दुय्यम संघ भारताविरुद्ध खेळेल.
या वाहिनीवर होणार प्रक्षेपण
या मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क सोनी स्पोर्टस नेटवर्ककडे आहेत. सामन्याचे इंग्रजी प्रसारण सोनी टेन १ व सोनी सिक्स, हिंदी प्रसारण सोनी टेन ३ तर तमिळ आणि तेलगू भाषेतील प्रसारण सोनी टेन ४ या वाहिन्यांवर केले जाईल. तसेच सोनी लिव ॲपवर देखील हे सामने पाहता येऊ शकतात.
प्रत्येक भाषेतील कॉमेंट्री पॅनल-
इंग्रजी- मॅट फ्लॉयड, संजय मांजरेकर, अजित आगरकर, अजय जडेजा
हिंदी- अर्जुन पंडित, मोहम्मद कैफ, विवेक राझदान, अमित मिश्रा, सबा करीम
तमिळ- लक्ष्मण शिवरामकृष्णन, डब्ल्यूव्ही रमण, विद्युत शिवरामकृष्णन, टी आरसू, एस शेषाद्री
तेलगू- व्यंकटपति राजू, ज्ञानेश्वर राव, सी वेंकटेश, संदीप कुमार, विजय महावाडी
ऑन ग्राउंड- रसेल अर्नोल्ड, मुरली कार्तिक
महत्त्वाच्या बातम्या-
खुलासा: २००७ विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर द्रविडने इरफान अन् धोनीला नेले होते ‘या’ ठिकाणी
‘पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावणे म्हणजे इतर खेळाडूंचा अपमान,’ विश्वविजेता कर्णधार संतापला
मी चकित झालोय, दुखापत असूनही शुबमन इंग्लंडला गेलाच कसा? माजी यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न