बुधवारी (दि. 19 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 26वा सामना राजस्थान रॉयल्स वि लखनऊ सुपर जायंट्स संघात जयपूर येथे पार पडला. राजस्थानचा गड मानल्या जाणाऱ्या सवाई मानसिंग स्टेडिअमवरील सामन्यात लखनऊने 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानला पराभूत व्हावे लागले. सलामीच्या फलंदाजांनंतर इतर कोणीही जबाबदारीने न खेळल्याने राजस्थानला हा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राजस्थानचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या अमोल मुजुमदार यांनी राजस्थान संघाची कमजोरी सांगितली आहे.
राजस्थानला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती. बटलर व यशस्वी जयस्वाल या जोडीने 87 धावांची सलामी दिल्यानंतरही संघ 155 धावांचा पाठलाग करू शकला नाही. त्याबद्दल बोलताना मुजुमदार यांनी एका क्रिकेट संकेतस्थळावर म्हटले,
“राजस्थान संघात जवळपास सर्व युवा भारतीय फलंदाज आहेत. संजू, यशस्वी आणि देवदत्त एकाच पठडीतले फलंदाज आहेत जे परिणामांचा विचार न करता चेंडू पाहून त्यावर प्रहार करतात. या संघाची कमजोरी मला तीच दिसते, यामध्ये त्यांच्याकडे एक असा फलंदाज हवा, जो परिस्थितीनुसार खेळेल. सामना अखेरपर्यंत मेल्यावर जिंकून देणारा फलंदाज राजस्थानला हवा आहे. जयपूर येथील मैदान मोठे असून तिथे तुम्हाला गॅप शोधून फलंदाजी करावी लागते.”
या सामन्याचा विचार केल्यास राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावा केल्या. त्यांच्यासाठी कायले मेयर्सने अर्धशतक झळकावले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी दिली. मात्र, त्यानंतर इतर फलंदाजांना अपयश आल्याने राजस्थान संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावत 144 धावाच करता आल्या. त्यामुळे लखनऊने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला.
(Amol Muzumdar Talking About Rajasthan Royals Weakness In Batting Line Up)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रमोशन फेरीत अहमदनगर पेरियार पँथर्सची विजयी सुरुवात
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर मात