बर्मिंगहॅम। आजपासून(1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून एजबस्टर्न स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला जोरदार धक्का बसला आहे.
त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला सामन्यादरम्यान उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यामुळे त्याला सामना सुरु झाल्यानंतर केवळ चार षटकेच गोलंदाजी करता आली.
त्याला चौथे षटक टाकताना पोटरीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने तो मैदानाबाहेर गेला. आता त्याच्या पोटरीचे स्कॅन करण्यात येणार आहे, असे वृत्त cricket.com.auने दिले आहे. त्यामुळे तो पहिल्या सत्रानंतर मैदानात उतरलेला नाही.
37 वर्षीय अँडसरनला कौउंटी क्रिकेटमध्ये लँकाशायरकडून डरहम विरुद्ध खेळताना 2 जूलैला पोटरीची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मागील महिन्यात झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते. परंतू तो पहिला ऍशेस सामना खेळण्यासाठी फिट झाला होता. मात्र त्याला पुन्हा या दुखापतीचा त्रास झाला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात पहिल्या सत्रात 3 बाद 83 धावा केल्या आहे. त्यांचे कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट(8), डेव्हिड वॉर्नर(2) आणि उस्मान ख्वाजा(13) हे क्रिकेटपटू पहिल्याच सत्रात स्वतात बाद झाले.
https://twitter.com/englandcricket/status/1156905937770356736
https://twitter.com/cricketcomau/status/1156901527195475968
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–क्रिकेट क्षेत्रातील बेकारी वाढली, कोचच्या पदासाठी आले हजारो अर्ज
–‘हिटमॅन’ रोहित शर्माने केलेला हा खास ट्विट होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल…
–मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स संघात झाली या खेळाडूंची अदला-बदली