मंगळवारी (९ फेब्रुवारी) इंग्लंड संघाने भारताविरुद्ध ४ सामन्यांच्या कसोटी मालितेली पहिला सामना २२७ धावांनी जिंकला. त्याआधी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश हे कसोटी सामने देखील पार पडले. आता बुधवारी या सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
या ताज्या क्रमवारीनुसार गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठी झेल घेतली आहे. कसोटी कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने तीन स्थानांची प्रगती करत पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. आता तो या यादीत पॅट कमिन्स आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या पोठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आल्याने निल वॅगनर, जोश हेजलवूड आणि टीम साऊदी एक-एक स्थानाने खाली घसरले आहेत.
अँडरसनने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४६ धावा देत २ विकेट्स आणि दुसऱ्या डावात १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने एकाच षटकात शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना त्रिफळाचीत केले होते.
आर अश्विन, बुमराह पहिल्या १० मध्ये कायम…
अँडरसन व्यतिरिक्त आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे भारतीय गोलंदाज पहिल्या १० गोलंदाजांमध्ये कायम आहेत. अश्विन ७ व्या क्रमांकावर कायम आहे. तर बुमराहने एका स्थानाची प्रगती करत ८ वे स्थान मिळवले आहे.
याशिवाय जॅक लीच आणि डॉमनिक बेस यांनीही क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. लीच ३७ व्या तर बेस ४१ व्या क्रमांकावर आला आहे. लीचने भारताविरुद्ध पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स तर बेसने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १ विकेट घेतली होती. Anderson moves up three spots to No.3 latest update of the ICC Test bowlers rankings.
🔥 Anderson moves up three spots to No.3
↗️ Ashwin, Bumrah climb upBowlers make significant gains in the latest update of the @MRFWorldwide ICC Test Player Rankings.
Full list: https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/XELbZKy2jY
— ICC (@ICC) February 10, 2021
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हसन अलीचीही प्रगती
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेण्याची कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या फायदा त्याला क्रमवारीत झाला असून तो २१ स्थानांनी पुढे जात ३२ व्या क्रमांकावर आला आहे. याशिवाय मोहम्मद अब्बास १२ व्या तर शाहीन आफ्रिदी ३० व्या क्रमांकावर आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा एन्रिच नॉर्किए ३३ व्या क्रमांकावर आला आहे, तर जॉज लिंड तब्बल ३६ क्रमांकाने पुढे येत ७४ व्या स्थानावर आला आहे.
बांगलादेश विरुद्ध चटगांव येेथे मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर वेस्ट इंडिजचे फिरकीपटू जोमेल वॉरिकनने ६२ व्या तर राहकिम कॉर्नवॉल ६५ व्या क्रमांकावर आला आहे. तर बांगलादेशच्या मेहदी हसनने २८ व्या क्रमांकावरुन २४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नॅथन लायनला जर्सी भेट, मात्र रुटला काहीच नाही? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विचारला प्रश्न
क्या बात! पृथ्वी शॉ झाला उपकर्णधार, आता धडाकेबाज फटकेबाजी करुन टीकाकारांना देणार चोख उत्तर
ऐश्वर्याची मीस वर्ल्ड म्हणून निवड ते वॉर्नर-स्मिथची चोरी पकडणार अवलिया क्रिकेटर डिविलियर्स