मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू अँडिले फेहलूक्वायो याने एक ट्विट केले. त्यानंतर संघाचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल होऊ लागली.
फेहलूक्वायोनी ट्विटरद्वारे पुन्हा स्पष्ट केले की त्यांनी मॉर्ने मॉर्केलसाठी नसून मॉर्ने व्हॅन रेनसबर्ग यांना ट्विट केले आहे. खरं तर फेहलूकवायोने पहिल्या ट्वीटमध्ये आरआयपी मॉर्ने लिहिलं, त्यानंतर चाहत्यांनी त्यांना हे ट्विट मॉर्केल मॉर्केलसाठी आहे का असं विचारण्यास सुरवात केली. त्यांच्या पुढच्या ट्विटमध्ये फेहलूक्वायोने लिहिले की, ‘मॉर्ने व्हॅन रेनसबर्ग’.
RIP 💔💚 Morne
— Andile Phehlukwayo (@andileluck19) July 23, 2020
Morne Van Rensburg
— Andile Phehlukwayo (@andileluck19) July 23, 2020
त्यानंतर फेहलूक्वायोला चाहत्यांनी चांगलेच सुनावले. चाहत्यांनी लिहिले की, अशा ट्वीटमध्ये फेहलूक्वायो याने व्यक्तीचे पूर्ण नाव लिहायला हवे होते.
Not good to not put full names..so many Morne's. Du Plessis. Morkel Steyn..come chap…think a little
— Paul Stubbs (Compleat Golfer ) (@UncleStubbsy1) July 23, 2020
https://twitter.com/MD_Malvin/status/1286383196310048774
मॉर्ने मॉर्केलची गणना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. 2018 मध्ये, मॉर्ने मॉर्केल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मॉर्केलने एकूण 86 कसोटीत 308 बळी, 117 वनडेत 188 बळी आणि 44 टी20 मध्ये 47 बळी घेतले. मॉर्केलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एप्रिल 2018 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
फेहलूक्वायो सध्या दक्षिण आफ्रिका संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. अष्टपैलू म्हणून फेहलूक्वायो खेळत असून त्याने त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
भारतीय क्रिकेट वर्तुळात अतिशय आदराने नाव घेतले जाणारे एनकेपी साळवे होते तरी कोण?
आनंदाची बातमी! १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आयपीएल २०२०
आता भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा धोक्यात, होऊ शकतो वेळापत्रकात मोठा बदल