इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आता बिग बॅश लीगमध्ये (BBL) बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. त्याने शुक्रवारी (१० डिसेंबर) सिडनी थंडर्स संघाविरुद्ध मेलबर्न स्टार्स संघासाठी हंगामातील पहिला सामना खेळला. मात्र, असे असले तरीही त्याला आपल्या संघापासून अलिप्त राहावे लागत आहे. त्याच्या एकट्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अत्यंत कठोर नियम अवलंबले आहेत.
घातल्या गेल्या या अटी
आंद्रे रसेल (Andre Russell) या स्पर्धेतील सर्व खेळाडूंपासून काही काळ २ मीटर दूर राहणार आहे. त्याला सामन्यादरम्यानही हा नियम पाळावा लागतो. रसेलला वेगळ्या गेटमधून प्रवेश करावा लागेल. त्याला संघासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास मनाई केली गेली आहे. त्याचे डगआऊट देखील वेगळे असेल. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्धी खेळाडू बाद झाल्यास तो आपल्या संघ सहकार्यांसोबत आनंद देखील साजरा करू शकणार नाही.
अलीकडेच आंद्रे रसेल टी१० लीग खेळला आहे. ही लीग यूएईमध्ये झाली होती. गेल्या आठवड्यातच रसेल ऑस्ट्रेलियाला आला आहे. अशा परिस्थितीत त्याला तेथील कडक कोरोना नियमावलीचे पालन करावे लागेल. रसेल केवळ तीन दिवस क्वारंटाईन झाला होता. ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार, त्याला सात दिवस इतरांपासून दूर राहावे लागेल. त्यामुळे आणखी काही दिवस रसेल याला हे सर्व नियम पाळावे लागतील.
पहिल्या सामन्यात केल्या १७ धावा
सरावाच्या वेळीही रसेलला सर्व सहकारी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसोबत २ मीटरचे अंतर राखावे लागेल. हाच नियम सामन्यादरम्यान विरोधी संघातील खेळाडूंना पाळावा लागेल. त्याच वेळी या हंगामातील आपला पहिला सामना खेळताना रसेलने ९ चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने १७ धावांची खेळी केली. या रोमांचक सामन्यात मेलबर्नने सिडनी संघाचा चार धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजनने जागविल्या जुन्या आठवणी! तुम्ही ओळखू शकता का त्याचे ‘हे’ दोन सहकारी?
विक्रमवीर रूट!! गॅबा कसोटीत अर्धशतकी खेळी करत माजी इंग्लिश कर्णधारासह पाँटिंगला पछाडले
“२०१९ विश्वचषकातील त्या निर्णयाशी मी सहमत नव्हतो”; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट