---Advertisement---

भारताविरुद्ध पहिला टी२० सामना खेळण्याआधी विंडीजला मोठा धक्का!

On: शनिवार, ऑगस्ट 3, 2019 12:58 PM
---Advertisement---

आजपासून(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरीडाला होणार आहे. पण या सामन्याआधी वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांना अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसल पहिल्या दोन टी20 सामन्यातून बाहेर पडला आहे.

त्याला ग्लोबल टी20 लीग स्पर्धा खेळताना फिटनेसची समस्या जाणवत असल्याने तो भारताविरुद्धच्या पहिल्या 2 टी20 सामन्यातून बाहेर पडला आहे. रसलने स्वत: त्याच्या अनुपलब्धतेबद्दल प्रभारी निवड समीतीला माहिती दिली आहे.

त्याच्या ऐवजी पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी जेसन मोहम्मदला वेस्ट इंडीज संघात संधी देण्यात आली आहे. मोहम्मदने आत्तापर्यंत वेस्ट इंडीजकडून 28 वनडे सामने आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 551 आणि टी20 मध्ये 90 धावा केल्या आहेत.

त्याच्याबद्दल सांगताना वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फ्लॉइड रेफर म्हणाले, ‘ पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी जेसन मोहम्मदचे संघात स्वागत आहे. त्याच्याकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटचा अनुभव आहे. त्याने त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गयाना अॅमॅझॉन वॉरियर्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.’

वेस्ट इंडीज आणि भारत संघातील पहिले दोन टी20 सामने अनुक्रमे आज आणि उद्या फ्लोरिडाला होणार आहेत हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होतील. या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 6 ऑगस्टला होणार आहे.

पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ – 

कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), अँथनी ब्रॅम्बल, जॉन कॅम्पबेल, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, सुनील नारायण, किमो पॉल, खॅरी पिएर, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, जेसन मोहम्मद आणि ओशान थॉमस.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा माझा एकट्याचा निर्णय नव्हता – संजय बांगर

कसोटीमध्ये क्रमांक, नाव असलेली जर्सी घालण्यावर भडकला हा माजी यष्टीरक्षक

…आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment