इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील (आयपीएल २०२२) सातव्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स व या वर्षी प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होत असलेला लखनऊ सुपरजायंट्स (CSKvLSG) हे संघ आमनेसामने आले. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी लखनऊ संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्रु टायने पदार्पण केले.
टायचे लखनऊसाठी पदार्पण
आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला आपल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यापूर्वी त्यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान याला संघातून वगळले. त्याच्या जागी टायने लखनऊसाठी पदार्पण केले. पहिल्या सामन्यासाठी टाय उपलब्ध नव्हता.
.@aj191 set for his @LucknowIPL debut. 👏 👏#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/QyUnaxEyxx
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
टाय याला आयपीएलच्या लिलावात कोणीही बोली लावली नव्हती. मात्र, लखनऊ संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाल्याने टायला त्याचा बदली खेळाडू म्हणून बोलावण्यात आले. सामन्यापूर्वी लखनऊ संघाच्या हडलमध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी त्याला कॅप प्रदान केली.
आयपीएलचा भरपूर अनुभव
अँड्रु टाय याला आयपीएल खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याने २०१६ मध्ये गुजरात लायन्स संघासाठी खेळताना आयपीएल पदार्पण केले होते. त्यानंतर तो दोन वर्ष पंजाब किंग्सचा भाग राहिला. २०१८ मध्ये त्याने सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली. त्यानंतर २०२० व २०२१ मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघासाठी काही सामने खेळला.
त्याच्या आयपीएल कारकीर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याने आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याने आयपीएलच्या २७ सामन्यांमध्ये ४० बळी आपल्या नावे केले आहेत. वूडच्या अनुपस्थित लखनऊ सुपरजायंट्सला टायकडून मोठ्या अपेक्षा असतील.
महत्वाच्या बातम्या-