---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक: दोनवेळच्या सुवर्णपदक विजेत्या अँडी मरेने ‘या’ कारणाने एकेरी स्पर्धेतून घेतली माघार; दुहेरीत खेळणार

---Advertisement---

टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिक २०२० चा थरार सुरु आहे. क्रीडा क्षेत्रातील कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडू आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरेला टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याला दुखापतीमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. असे असले तरी तो दुहेरी गटात मात्र खेळणार आहे.

मरेने यापूर्वी एकेरीत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तो ऑलिम्पिकमधील टेनिस खेळातील गतविजेतादेखील आहे. मात्र, सध्या तो दुखापतीचा सामना करत आहे. त्याच्या उजव्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण आल्याने त्याने एकेरी गटातून आपले नाव मागे घेतले आहे.

या निर्णयाबद्दल त्याने सांगितले की ‘एकेरीतून माघार घेण्याने मी खरंतर निराश आहे, पण माझ्या डॉक्टरांनी मला दोन स्पर्धांपैकी एकातच भाग घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी एकेरीतून माघार घेण्याचा कठीण निर्णय घेतला. आता माझे पूर्ण लक्ष दुहेरीतील सामन्यांवर असेल.’

मरे दुहेरीत जो सेलिसबरीच्या जोडीने खेळत आहे. या दोघांच्या जोडीने शनिवारी (२४ जुलै) फ्रान्सच्या पिअर ह्यूज हबर्ट आणि निकोलस माहून यांना पहिल्या फेरीत ६-३, ६-२ अशा फरकाने पराभूत केले आहे.

मरेने २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आणि २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये एकेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच त्याने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधून अनेक दिग्गज टेनिसपटूंची माघार 
टोकियो ऑलिम्पिकमधून अनेक दिग्गज टेनिसपटूंनी यापूर्वीच माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेणाऱ्या स्टार टेनिसपटूंच्या यादीत रॉडर फेडरर, राफेल नदाल, डॉमनिक थीम, सेरेना विलिम्स, सिमोना हालेप, निक किरगियॉस, स्टॅन वावरिंका अशा अनेकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या हाती पुन्हा निराशा! सानिया अन् अंकिताची जोडी पहिल्या राऊंडमध्येच बाहेर

अभिमानास्पद! सुमित नागल बनला ऑलिंपिकमध्ये टेनिस एकेरी सामना जिंकणारा तिसरा भारतीय धुरंधर

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---