श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज ऍंजेलो मॅथ्यूज हा सोमवारी (6 नोव्हेंबर) विचित्र पद्धतीने बाद झाला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 38 व्या सामन्यात मॅथ्यूजच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्याची सध्या क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा होत आहे. आता या प्रकरणावर मॅथ्यूजच्या भावाने अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
मॅथ्यूज (Angelo Mathews) बांगलादेश संघाविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी सहाव्या क्रमांकावर उतरला होता. मात्र, तो यादरम्यान चुकीचे हेल्मेट घेऊन मैदानावर आला. यावेळी त्याने संघाला दुसरे हेल्मेट घेऊन येण्यासाठी इशारा केला. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. अशात बांगलादेशच्या खेळाडूंनी पंचांकडे टाईम-आऊटची अपील केली. पंचांनी अपील मान्य केल्यामुळे अँजेलो मॅथ्यूज टाईम-आऊट (Angelo Mathews Time Out) पद्धतीने बाद झाला. तो अशाप्रकारे बाद होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला.
https://twitter.com/HemantaSethi08/status/1721860726707396862?t=z5O-tuSimSKAy28v9T2BMA&s=19
या प्रकरणावर क्रिकेटविश्वात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याच्या भावाने याविषयी बोलताना म्हटले,
“त्यावेळी जे घडले ते अतिशय निंदनीय होते. आम्ही यापुढे शाकिबचे श्रीलंकेत स्वागत करणार नाही. तो यापुढे श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय सामना अथवा लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी आला तर, त्याला दगड मारले जातील.”
या प्रकरणावर शाकिबने आपला पक्ष ठेवत हे नियमाला धरून असल्याचे म्हटले होते. तर, मॅथ्यूज याने यामुळे आपल्या मनातून शाकिब आणि बांगलादेशची प्रतिमा उतरल्याचे म्हटलेले आहे. इतकेच नव्हे तर सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन देखील टाळलेले.
(Angelo Mathews Brother Said We Will Throw Stones On Shakib In Srilanka)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच