भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत अनेक वेळा अविस्मरणीय कामगिऱ्या केल्या आहेत. कुंबळेने भारतासाठी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला आहे. आज (17 ऑक्टोबर 2023) कुंबळे त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पाकिस्तानविरुद्धच्या दिल्ली कसोटीतील त्याच्या कामगिरीची रंजक कहाणी आज पाहणार आहोत.
1999 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळला गेला होता. भारताने या सामन्यात 212 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कुंबळेने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यानी भारताला एकहाती पाकिस्तानवर विजय मिळवून दिला होता. या सामन्यात भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या. तर पाकिस्तानचा संघ १७२ धावांवरच गडगडला. या डावात कुंबळेने 24.3 षटकात 75 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने 339 धावा केल्या. भारताकडून गांगुलीने ६२ धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 207 धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावातही कुंबळे पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने 26.3 षटकात 74 धावा देत 10 बळी घेतले. कुंबळेची ही कामगिरी कायम अविस्मरणीय ठरली.
अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत 132 कसोटी सामने खेळताना 619 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने 35 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. तर 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 337 विकेट्स घेतल्या आहेत.
(Anil Kumble Birthday He Turned 53 Today)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?