---Advertisement---

“तुम्ही आराम करु शकत नाही… “, लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सुनावलं

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 2:49 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सुरुवात पर्थमध्ये शानदार विजयाने केली. पण टीम इंडियाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पिंक बॉल कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकला. आता तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे. डे-नाईट टेस्ट हरल्यानंतर भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला एक संदेश दिला आहे.

कसोटी सामना हा 5 दिवसांचा असतो. मात्र हा सामना केवळ 7 सत्रांमध्ये (2 दिवस आणि एक सत्र) संपला. पण पुढील दोन दिवस खेळाडूंनी हॉटेलच्या रुममध्ये किंवा जिथे मुक्काम करणार आहेत तिथे विश्रांती घ्यावी. असे सुनील गावसकरांना वाटत नाही. सुनील गावस्कर म्हणाले, “उरलेल्या सामन्यांकडे तीन सामन्यांची मालिका म्हणून बघा. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका होती हे विसरा. भारतीय संघाने पुढील दोन दिवस सरावासाठी वापरावेत, अशी माझी इच्छा आहे. हे फार महत्वाचे आहे. तुम्ही हॉटेलच्या खोलीत आराम करु शकत नाही. कारण तुम्ही इथे क्रिकेट खेळण्यासाठी आला आहात”.

ते पुढे म्हणाला, ‘तुम्हाला पूर्ण दिवसभर सराव करण्याची गरज नाही. तुम्ही सकाळ किंवा दुपारच्या सत्राचा सराव करू शकता. जी वेळ तुमच्यासाठी योग्य आहे त्या वेळेत करा. पण हा दिवस वाया घालवू नका. टेस्ट मॅच पाच दिवस चालली असती तर तुम्ही इथे मॅच खेळला असता. लयीत येण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. कारण तुम्ही धावा केल्या नाहीत. आपल्या गोलंदाजांना लय सापडलेली नाही. आणखी काही खेळाडू आहेत ज्यांनी मैदानावर वेळ घालवला पाहिजे.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले, ‘पर्यायी सराव सत्र ही गोष्ट मला योग्य वाटत नाही. सरावाचा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षकाने घ्यावा. ‘अरे, तू दीडशे धावा केल्या आहेत, तुला सरावाची गरज नाही. अहो, तुम्ही सामन्यात 40 षटके टाकलीत, तुला सरावाची गरज नाही. असे प्रशिक्षकाने सांगू नये, खेळाडूंना हा पर्याय देऊ नये.

मात्र, अनुभवी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि विराट कोहली सरावाला येणार की नाही हे सुनील गावस्कर यांनी खेळाडूंवर सोडले आहे. मात्र युवा खेळाडूंना अधिक सरावाची संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचा-

टीम इंडिया अजूनही WTC फायनलमध्ये पोहचू शकते का? आता हा एकच मार्ग बाकी
गोलंदाजीनंतर मोहम्मद शमीचा फलंदाजीतही कहर! या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी
भारताचा हा अष्टपैलू खेळाडू लवकरच ‘डॉक्टर’ बनणार! लिलावात मिळाली होती मोठी रक्कम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---