---Advertisement---

भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी

---Advertisement---

पुढच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता 2020 आयपीएल मोसमासाठी पंजाब संघाचा क्रिकेट कार्यकारी संचालक असणार आहे.

कुंबळेने याआधी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याने 2017 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्याने याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब संघ कुंबळेची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्याबरोबरच अन्य प्रशिक्षकपदांसाठीही नवीन नियुक्ती करणार असण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये माजी भारतीय फिरकी गोलंदाज सुनील जोशींची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी रॉड्सची क्षेत्ररक्षकपदी तर वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी गोलंदाज कर्टनी वॉश यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. तसेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून किंग्स इलेव्हन पंजाबचे माजी कर्णधार जॉर्ज बेलीची निवड होऊ शकते.

तो कर्णधार असताना पंजाबने 2014च्या मोसमात कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना खेळला होता. मात्र या सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. पंजाबने आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment