टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये शनिवार (३१ जुलै) भारतीय नेमबाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. असाका शूटिंग रेंज येथे महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये भारतीय नेमबाज अंजुम मोदगिल आणि तेजस्विनी सावंत अंतिम सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत.
या सामन्यात अंजुमने एकूण ११६७ स्कोर केला. त्यामुळे तिला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे तेजस्विनीने ११५४ स्कोर केला. यासह ती एकूण ३७ नेमबाजांमध्ये ३३ व्या स्थानी घसरली. (Anjum Moudgil and Tejaswini Sawant fail to make it to the Final 50m)
#IND fails to make the cut in the Women's 50m Air Rifle 3 positions 💔
Anjum Moudgil – 15th
Tejaswini Sawant – 33rd#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Shooting— Olympic Khel (@OlympicKhel) July 31, 2021
क्वालिफिकेशनच्या शेवटच्या राऊंडमध्ये अंजुमने ९४, ९५, ९६ आणि ९७ च्या स्कोरसह ३८२ गुण मिळवले. त्याचबरोबर तिने नीलिंगमध्ये ३९० आणि प्रॉनमध्ये ३९५ गुण मिळवले होते.
Our shooters #TejaswiniSawant and @anjum_moudgil will be competing in the Women's 50m Rifle 3 Positions qualification at #Tokyo2020 in some time. Stay tuned for live updates. #Cheer4India pic.twitter.com/YftkmQGi8d
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2021
दुसरीकडे तेजस्विनीने स्टँडिंगमध्ये ९४, ९३, ९५ आणि ९४ च्या स्कोरसह ३७६ गुण मिळवले. त्यानंतर नीलिंगमध्ये ३८४ आणि प्रॉनमध्ये ३९४ गुण मिळवले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक
-लंडन ऑलिंपिक मेडलिस्टकडून अतनू दास पराभूत; तिरंदाजीतील भारताचे आव्हान संपुष्टात