---Advertisement---

जेव्हा धोनी मित्र रैनाला म्हणाला होता, ‘तुम्ही मोठी माणसं आहात, मला पुन्हा बोलवू नकोस’

On: रविवार, जुलै 18, 2021 3:53 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा एक सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. धोनीबद्दल प्रत्येक खेळाडूचे असे मत असते की, तो मैदानावर खेळाडूंना खूप पाठिंबा देत असतो. अगदी आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्जमधील प्रत्येक भारतीय आणि परदेशी खेळाडूला तो सावरुन घेतो. याच संघातील त्याचा जवळचा मित्र आणि माजी भारतीय दिग्गज सुरेश रैना याने धोनीसोबतचा एक जुना किस्सा सांगितला आहे.

22 यार्न्स पॉडकास्टमध्ये गौरव कपूर सोबत बोलताना सुरेश रैनाने 2018 मधील आयर्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. रैना म्हणाला की, “मला एक किस्सा खूप चांगलाच आठवतो. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापुर्वी धोनी भाई असा विचार करत होता की, मी फलंदाजी करताना बर्‍याचदा हातमोजे व बॅट्सची मागणी करत असतो. म्हणून त्याने संपूर्ण किट बॅगच माझ्यासमोर आणली आणि म्हणाला की तुला जे पाहिजे ते घेऊन जा. मला परत बोलावू नकोस.”

तू खूप मोठा आहेस
सुरेश रैना म्हणाला की, “यानंतर मी धोनीला सांगितले की मग आता एक काम कर, ग्रीप देखील घेऊन ये. यावर धोनी म्हणाला, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही थांबा. पाणी प्या, मी घेऊन येतो. मला तेव्हा धोनीला सतावताना खूप मजा आली होती.”

या कर्णधार साहेब या
2016 मध्ये आयपीएलमध्ये सीएसके संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. यानंतर सुरेश रैनाला गुजरातकडून खेळावे लागले तर एमएस धोनीला पुण्याकडून खेळावे लागले होते.

याबद्दल सुरेश रैना हसत म्हणाला की, “मला आठवते की आम्ही राजकोटमध्ये खेळत होतो आणि अश्विन गोलंदाजी करीत होता. मॅक्युलम नॉन-स्ट्रायकरवर होता. मी फलंदाजी करत होतो. धोनी यष्टिरक्षण करत होता. फाफ डु प्लेसिस स्लिपवर होता, हे सर्व पाहून असे वाटले की आम्ही आमच्या घरा शेजारी खेळली जाणारी कांगा लीग खेळत आहोत.”

रैना पुढे म्हणाला की, “जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा धोनी भाई आला आणि म्हणाला की या कर्णधार साहेब या. त्यावर मी म्हणालो की, भाई, थोडे मागे उभे रहा. हे सर्व खूप मजेदार होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा’ फलंदाज भरुन काढणार एबी डिवीलियर्सची जागा! अवघ्या ७ वनडेत ठोकलीत २ द्विशतके

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन महारथींचं टीम इंडियाच्या वनडे संघात पदार्पण!

राशिद खानचा फलंदाजीत जलवा! टी२० सामन्यात ठोकला विचित्र षटकार, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---