आयपीएलमध्ये पहिल्या फेरीच्या यशस्वी सामन्यांनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. दिल्लीला प्रथम फलंदाजी करताना केवळ 162 धावा करता आल्या. या धावांचा बचाव करताना दिल्लीसाठी या हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या एन्रिक नोर्कीए याने आपल्या वेगवान गोलंदाजीचे प्रात्यक्षिक घडवत गुजरातचे दोन्ही सलामीवीर तंबूत पाठवले.
दिल्लीने या सामन्यात अक्षर पटेलने दिलेल्या झुंजीमुळे 8 बाद 162 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला चांगल्या सुरुवातीचे अपेक्षा होती. दोन षटकात 22 धावा केल्यानंतर तिसऱ्या षटकात दिल्लीचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रिक नोर्कीए गोलंदाजी करण्यासाठी आला. राष्ट्रीय संघासोबत असल्यामुळे तो पहिल्या सामन्याला मुकलेला. या सामन्यातील पहिला चेंडू टाकताना त्याने संघाला पहिले यश मिळवून दिले. 148 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्याने वृद्धिमान साहाचा त्रिफळा उडवला.
Shubman Gill is knocked over by a beauty of a delivery from @AnrichNortje02.
Take a look 👇
Live – https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023 pic.twitter.com/2PMqQtqs4p
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
त्यानंतर आपले दुसरे षटक टाकण्यासाठी आल्यानंतरही त्याने आपला दुसरा बळी मिळवण्यासाठी पहिलाच चेंडू घेतला. त्याने पुन्हा एकदा दुसरा सलामीवीर शुबमन गिल याला 149 किमीपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकून त्रिफळाचीत केले.
आपल्या घरच्या मैदानावर हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या दिल्लीला या सामन्यात अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 37 व सर्फराजने 30 धावा केल्या. मात्र, त्यांना धावांची अपेक्षित गती राखता आली नव्हती. अष्टपैलू अक्षर पटेल याने फलंदाजीला येत आक्रमक 36 धावा केल्या. गुजरात संघासाठी शमी व राशीद खान यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
(Anrich Nortje Fastest Bowling Against Gujarat Titans In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING । लवकरच श्रेयस अय्यरची मोठी शस्त्रक्रिया, आयपीएलसह महत्वाच्या सामन्यालाही मुकणार
आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज