जून २५, १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण दिवस. आजच्या दिवशी बरोबर ३९ वर्षांपूर्वी भारतीय संघाने पहिलावहिला विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला हरवून भारतीय संघ १९८३ साली क्रिकेटचा बादशाह ठरला होता. भारतीय संघाने संपूर्ण विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. प्रत्येक सामन्यात कोणतरी खेळाडू जबरदस्त खेळत असे. अष्टपैलू क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी तर १९८३च्या विश्वचषकाच्या महत्त्वपुर्ण अंतिम सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. याच मोहिंदर अमरनाथबद्दल अंशुमन गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
कपिल देव यांच्या भारतीय संघाने १९८३ साली वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला ४३ धावांनी मात देत विश्वचषक उंचावला होता. आज या पराक्रमाला ३८ वर्षे पूर्ण जाली आहेत. त्यानिमित्ताने माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. गायकवाड हे १९८३चा विश्वचषक सामना खेळले नव्हते. परंतु, मोहिंदर अमरनाथ यांचे ते चांगले मित्र होते.
गायकवाड यांनी एकदा न्यूज १८ डॉट कॉमसोबत बोलताना सांगितले की, “पहिल्यांदा भारतीय संघाला विश्वविजेता बनवण्यामध्ये कपिल देव, रोजर बिन्नी आणि मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका फार महत्वाची राहिली होती. १९७५ साली आम्ही वेस्ट इंडीजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना स्टेडीयममध्ये बसून बघत असताना अमरनाथने मला सांगितले होते, अंशू जर आपण सुद्धा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळलो तर किती चांगले असेल ना . त्यांचे हे स्वप्न पुढे ८ वर्षांनी पूर्ण झाले.”
“विश्वचषक जिंकून आल्यानंतर, मी कपिलला आणि अमरनाथला दोघांना शुभेच्या दिल्या. मी अमरनाथच्या खूप जवळचा होतो. त्यामुळे मला माहिती होते की, अमरनाथ कशी गोलंदाजी करतो. त्याचाकडे जास्त गती नव्हती. परंतु, त्याचाकडे गोलंदाजीचे वेगवेगळे प्रकार होते. त्याचाकडे चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचा समज होता आणि आणि अचूक टप्पा टाकण्याची शैली होती. इंग्लंडसारख्या खेळपट्टीवर तो एक उत्कृष्ट गोलंदाज होता. त्यावेळेस तो इंग्लंडमध्ये दरवर्षी काउंटी क्रिकेट खेळायचा. त्याला माहिती होते की, अशा खेळपट्ट्यांवर कशी गोलंदाजी केली जाते. या गोष्टीचा फायदा १९८३च्या विश्वचषकात झाला.”
१९८३ला अमरनाथ ३२ वर्षांचे होते. भारतीय संघाच्या विजयामध्ये अमरनाथ यांचा वाटा खूप मोलाचा होता. ते आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत आणि वेस्टइंडीजविरुद्ध अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले होते. अंतिम सामन्यात त्यांनी २६ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना १२ धावा देऊन ३ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३९ वर्षे
आयपीएलचा फॉर्म रणजी ट्रॉफीमध्ये कायम, मुंबईविरुद्ध एमपीसाठी पाटीदारचे धमाकेदार अर्धशतक
भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज या मालिकेतही खेळणार, वाचा संपूर्ण यादी