भारतीय संघ सध्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. हा सामना ४ मार्चला सुरु होणार आहे. पण या सामन्यातून भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. त्याने भारतीय नियामक मंडळाला काही वैयक्तिक कारणाने या सामन्यातून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी बीसीसीआयने मान्य केली. आता त्याच्या माघार घेण्याचे कारण लग्न असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार बुमराहने त्याच्या लग्नाच्या तयारीसाठी सामन्यांमधून घेतली असून तो येत्या आठवड्यात लग्नबंधनात अडकू शकतो. असे असले तरी अजून तो कधी आणि कोणाबरोबर लग्न करणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, असा कयास लावला जात आहे की बुमराह दक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनबरोबर लग्न करणार आहे.
त्यातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने गालाला रंग लावल्याचे फोटो पोस्ट केले असून कॅप्शन दिले आहे की ‘हॅपी हॉलिडे टू मी’. तिच्या या कॅप्शनमुळे आता बुमराह आणि तिच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला आहे. पण अजून बुमराह किंवा अनुपमाकडून कोणतेही अधिकृत भाष्य याबद्दल करण्यात आलेले नाही.
मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी बुमराहने तिच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने त्यांच्यात अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
https://www.instagram.com/p/CL3uW_0JSE5/
बुमराहऐवजी कोणाला मिळणार अंतिम ११ जणांमध्ये संधी
बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अंतिम ११ जणांमध्ये त्याच्याऐवजी कोणाला खेळवायचं हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यासाठी सध्या भारतासमोर उमेश यादव आणि मोहम्मद सिराज हे पर्याय आहेत. त्यामुळे आता त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचे खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर, “आम्ही जेव्हा न्यूझीलंडमध्ये…”
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळल्याचा वॉर्नरला होतोय पश्चाताप, ‘हे’ आहे कारण
गोलंदाजाने टाकला ‘असा’ घातक यॉर्कर की स्टंप्स चक्काचूर, एकदा व्हिडिओ पाहाच






