अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतेच विराटने इंस्टाग्रामवर चाहत्यांबरोबर प्रश्न-उत्तर सत्र आयोजित केले होते. यात त्याने चाहत्यांच्या काही निवडक प्रश्नांची उत्तरे दिले. दरम्यान या सत्रात एक प्रश्न त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही विचारला होता.
अनुष्काने विराट ला त्याच्या या प्रश्न-उत्तरांच्या सत्रात विचारलं की, “तू माझे हेडफोन्स कुठे ठेवलेत? यावर विराट म्हणाला की “नेहमीसारखेच बेडच्या बाजूला असणाऱ्या टेबलवर आहेत”. विराट आणि अनुष्काचा हा प्रेमळ अंदाज अनेक चाहत्यांना भावला आहे.
विराट आणि अनुष्का हे सध्याच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. या जोडप्याला याचवर्षाच्या सुरुवातीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.
विराटच्या या प्रश्न-उत्तरांच्या सत्रात वामिकाबद्दलही त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की तिच्या नावाचा अर्थ काय आणि तिची झलक कधी पाहायला मिळेल?
यावर विराटने उत्तर दिले की ‘वामिका हे देवी दुर्गाचे दुसरे नाव आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या मुलीला सोशल मीडिया समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियावर एक्स्पोझ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिला तिची निवड करु देणार आहोत.’
याशिवाय देखील चाहत्यांनी देखील विराटला अनेक प्रश्न विचारले आणि विराटने देखील दिलखुलासपणे उत्तरे दिली. एका चाहत्याने विचारले की, तू आता काय करतोयस त्याचा फोटो पाठवूशील का? लगेच विराटने देखील त्याचा चहा पीत असतानाचा फोटो पाठवला होता. विराटच्या एका चाहत्याने त्याला त्याच्या लहानपणीचा फोटो पाठवण्याची इच्छा दर्शवली. विराटने चाहत्यांची ही इच्छा देखील पूर्ण केली.
पुढील महिन्यात विराट इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना
विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघासह मुंबईत क्वारंटाईन आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघासह तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तो भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यात भारताला साउथँम्पटन येथे न्यूझीलंड विरुद्ध १८ ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ तीन संघ बदलू शकतात आपले कर्णधार, कारणे घ्या जाणून
तिसऱ्यांदा आयपीएल युएईमध्ये, पाहा तिथे सर्वाधिक धावा करणारे कोण आहेत ५ फलंदाज