---Advertisement---

जेव्हा लाईव्ह शोमध्ये अमिताभ यांनी अनुष्कापुढे काढलं विराटचं नाव, लाजेने लालबुंद झाली ‘मिसेस कोहली’

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 2:49 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असतात. तसेच त्यांचा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. विराट आपल्या फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात सामना असला, तरीही अनुष्का तो सामना पाहण्यासाठी हजेरी लावत असते. हे दोघेही नेहमी आपले एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना दिसून येत असतात. नुकताच अनुष्का शर्मा आणि अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा खूप खुश होताना दिसून येत आहे. कारण तिने अमिताभ बच्चन यांचा शो ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी तिची मजादेखील घेतली होती.

तर झाले असे होते की, अनुष्का आणि एक कंटेस्टंट हॉट सीटवर बसले होते. त्यांना बच्चन यांनी क्रिकेटशी निगडित प्रश्न विचारला होता. त्यांनी विचारले होते की, “तुम्ही क्रिकेट पाहता का?” यावर कंटेस्टंट म्हणते की, “मी नाही पाहत क्रिकेट.” त्यानंतर अनुष्का त्या कंटेस्टंटला सांगते की, “माझे पती क्रिकेटर आहेत .त्यांना पाहण्यासाठी मी क्रिकेट पाहते.” यावर अमिताभ म्हणतात, ” फक्त त्यांना पाहण्यासाठी??” या प्रश्नावर लाजून उत्तर देत अनुष्का म्हणते की, “नाही सर, संघाला समर्थन करण्यासाठी.”

https://www.instagram.com/p/CNMHZfVhu0S/?igshid=15tf25nktzn9g

 

यावेळी शोचे संपूर्ण वातावरण बदलून जाते. सर्वांच्या चेहऱ्यावर हशा फुटतो.  पुढे अनुष्काने दिलेल्या उत्तरावर अमिताभ बच्चन म्हणतात की, “सर्वांना माहीत आहे की, टिव्हीवर काय होते. इतक्यातच अमिताभ बच्चन अनुष्काकडे फ्लाइंग किसचा इशारा करतात.” अमिताभ बच्चनने असे केले. कारण जेव्हा विराट कोहलीने एकदा शतक झळकावले असताना तेव्हा अनुष्का देखील मैदानावर उपस्थित होती. त्याने तिला फ्लाइंग किस दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाब किंग्जचे २२ कोटी पाण्यात, ज्यांच्यावर बक्कळ पैसा ओतला; तेच आता संघावर बनलेत ओझं!

व्वा! यष्टीचा निशाणा हुकला आणि चेंडू अंपायरला लागला, मग काय रिषभने मोठ्या मनाने मागितली माफी

रजनी सर म्हातारे होत आहेत, म्हणून देवाने सर जडेजाला बनवलं; सर्वत्र रंगली माहीच्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---