आज (5 नोव्हेंबर) भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) 31वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) भूटानमध्ये (Bhutan) सुुट्ट्यांची मज्जा घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी अनुष्काने भूटानमधील काही फोटो शेअर केले आहेत.
“भूटानमध्ये एका स्थानिक कुटूंबाने आम्हाला “थकलेले दोन प्रवासी’ समजून एक कप चहा दिला. आम्ही सेलिब्रिटी असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती.” असे अनुष्काने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आम्ही त्या सुंदर आणि प्रेमळ कुटूंबियांच्या घरात गेलो. त्यांच्यापैकी कोणालाच माहिती नव्हते की आम्ही कोण आहोत. ते आमच्याशी अगदी प्रेमाने वागत होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत चहा घेतला. ते पूर्ण वेळ आम्हाला फक्त थकलेले दोन प्रवासी समजत होते. ” असेही अनुष्काने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आमच्याकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता त्यांना फक्त दोन परदेशी यात्रेकरूंसोबत दयाळूपणाने वागायचे होते. जर हा जीवनाचा अर्थ नसेल तर मला नाही माहिती ते काय आहे. ते नेहमी स्मरणात रहातील अशी ही आठवण आहे. “असे पाहुणचाराने भारावुन गेलेली अनुष्का म्हणाली.
अनुष्काचे सेलिब्रिटी असलेले मित्र आयुषमान खुराना, समंथा रूथ प्रभू, अनैता श्राॅफ अदाजानिया आणि मनिष मल्होत्रा यांनी तिची इंस्टाग्रामची पोस्ट लाईक केली.
“हेच साधे क्षण खूप महत्त्वाचे असतात.” असे बाॅलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमेंटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/AnushkaSharma/status/1191405823957667840






