ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दुसर्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळालेल्या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माने भारतीय संघ आणि विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. दुसर्या टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून पराभूत केले. यापूर्वी कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले होते. यासह वनडे मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला म्हणून भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचीही टी२० मालिका जिंकली आहे.
अनुष्का शर्माने पोस्ट केली इंस्टास्टोरी
टी२० मालिकेतील भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक स्टोरी पोस्ट करत, भारतीय संघ व विराट कोहलीचे अभिनंदन केले. या पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले होते की, ‘मालिका जिंकली आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरी. मेन इन ब्लू. अभिनंदन माय लव्ह.’ यासोबतच तीने हृदयाचा इमोजी देखील शेअर केला आहे.
@AnushkaSharma last night congratulated hubby #ViratKohli on team India's win in the T 20 series against Aus. 'Congratulations my Love,she posted on Instagram with a pic of the team celebrating its victory in the 2nd T 20 match. India beat Aus by 6 wickets in yesterday's match. pic.twitter.com/LtGvd79VBC
— Rajesh Ahuja (@raju0524) December 7, 2020
८ डिसेंबर रोजी खेळला जाईल अखेरचा टी२० सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. टी२० मालिकेनंतर उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना ऍडलेडमध्ये खेळला जाईल. हा दिवस-रात्र स्वरूपाचा सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे.
विराटने घेतली आहे पालकत्व रजा
विराटची पत्नी अनुष्का गर्भवती आहे आणि ती जानेवारी २०२१ मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. अशा परिस्थितीत विराट कोहलीला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी कुटुंबासमवेत राहण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने बीसीसीआयकडे पालकत्व रजा मागितली होती, जी बीसीसीआयने मान्य केली आहे. काही दिवसांपूर्वीच, अनुष्काने योगासने करतानाचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. ज्यात, विराट अनुष्काला साथ करताना दिसला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग