---Advertisement---

विराट कोहलीपासून दूर जाताना अनुष्का शर्मा झाली भावूक; म्हणाली…

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 4:56 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली न्यूझीलंडला (New Zealand) गेलेला भारतीय संघ (Team India) आता कसोटी मालिकेसाठी (Test Series) सज्ज झाला आहे. या दौऱ्यादरम्यान विराटसह त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) न्यूझीलंडला गेली होती. ती आता भारतात परतली आहे.

यावेळी विराटपासून दूर जाताना अनुष्काने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून विराटसोबतचा एक सेल्फी शेअर करत एक भावूक मेसेजही शेअर केला आहे.

अनुष्काने शेअर केलेला हा फोटो विराटने सेल्फी मोडमध्ये घेतला आहे. या फोटोत विराटचे लक्ष फोटो काढण्यावर आहे. तसेच त्याच्यापासून थोड्या अंतरावर अनुष्का बसली असून तिने स्मित हास्य करत पोज दिला आहे.

https://www.instagram.com/p/B8qe1OTJQhX/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले की, “वेळेनुसार निरोप घेणे सोपे जाईल, असे तूला वाटते. पण असे कधीच होत नाही.”

पूर्वनियोजित कामकाजामुळे अनुष्काला मुंबईला जावे लागले आहे. मिळालेल्या बातमीनुसार, अनुष्का मंगळवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या फेमिना ब्यूटी अवॉर्ड्समध्ये सहभागी होणार आहे.

21 फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 2 सामन्यांच्या कसोटी (2 Matches of Test Series) मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टन (Wellington) येथे सुरु होणार आहे.

त्याचबरोबर या दौऱ्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत न्यूझीलंडला 5-0ने व्हाईटवॉश दिला होता. यानंतर मात्र वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला 3-0ने पराभूत केले होते.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229718470562131968

https://twitter.com/Maha_Sports/status/1229673048095252480

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---