भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसापुर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीच्या आगमनाने विराट आणि अनुष्का दोघेही खूप खुश आहेत. तसेच आता तिच्या आगमनानंतर विराट क्रिकेट खेळण्यात व्यस्त झाला आहे तर अनुष्का बरेच दिवस चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा चित्रिकरणाच्या कामावर आली असून तिने एका चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे.
अनुष्का शर्माने एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मेक-अपच्या खुर्चीवर बसलेली असून संपूर्ण टीम तिच्या भोवती फिरताना दिसत आहे. तसेच ती एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असल्याचे दिसत आहे आणि तिचा मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाइलिस्ट तिचा मेकअप करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CNHnjRxFe3G/
हा फोटो समोर आल्यानंतर अनुष्काचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सिमी ग्रेवाल यांनी अनुष्काच्या सिनेसृष्टीतील पदार्पणादरम्यान एक मुलाखत घेतली होती. यामध्ये सिमीने अनुष्काला तिच्या लग्नासंबधित प्रश्न केला होता.
सिमी ग्रेवाल यांच्या लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देताना अनुष्का म्हणाली की, “लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच मला मुले पण हवी आहेत. लग्न झाल्यावर मी कदाचीत काम करणार नाही.” पण आता जेव्हा ती पुन्हा कामावर परतली आहे, तेव्हा चाहते संभ्रमात पडले आहेत. कारण अनुष्का स्वत:च तिच्या बोलण्यावर कायम राहिली नाही.
https://www.instagram.com/p/CM6ttBbjw-n/
सध्या विराट आयपीएल २०२१ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात दाखल झाला आहे. बेंगलोरचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ एप्रिलला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या हॅशटॅगला चेन्नईची जर्सी! ट्विटरकडून मोठी चूक होताच संघांकडून आल्या ‘या’ प्रतिक्रिया
आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
कोरोनामुळे बीसीसीआयला टेंशन; ‘या’ शहराची राखीव ठिकाण म्हणून निवड