न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी मधील अ गटातील शेवटच्या सामन्यात विराट कोहली 11 धावा करून बाद झाला. विराट कोहलीसाठी हा 300 वा वनडे सामना होता. आणि हा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का स्टेडियम मध्ये उपस्थित होती. पण विराट आज काही चांगली खेळी करू शकला नाही. विराटचा एक अवघड कॅच फिलिप्सने पकडला आणि त्याला 11 चेंडूंवर परत जावे लागले. विराट बाद झाल्यानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित झाल्याची प्रतिक्रिया दिसत होती.
रोहित शर्मा (15) शुबमन गिल (2) धावा करून बाद झाले. त्यानंतर विराट वर दबाव आणि जबाबदारी दोन्ही आल्या होत्या. पण तोही लवकर बाद झाला. त्याने सातव्या षटकारातल्या चौथ्या चेंडूवर ऑफ साईडला चेंडू मारला. त्या ठिकाणी ग्लेन फिलिप्स उभा होता त्याने अवघड कॅच पकडत विराटला परत पाठवले. विराट आऊट झाल्यानंतर स्टेडियम मधील चाहते, निराश झाले त्याचबरोबर त्याची पत्नी अनुष्काने डोक्याला हात लावत ती उदास झाली.
सोशल मीडियावर अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो की विराट बाद झाल्यानंतरचा आहे. अनुष्काने तिच्या डोक्याला हात लावला आहे आणि ती निराश झालेली दिसत आहे. काही यूजर्सच असं म्हणणं आहे की अनुष्काने काहीतरी आश्चर्यचकित प्रतिक्रिया दिली.
विराट कोहलीसाठी आजचा त्याचा 300 वा एक दिवसीय सामना होता. हा आकडा पार करणारा विराट भारताचा सातवा खेळाडू आहे. भारतीय संघासाठी सगळ्यात जास्त वनडे खेळणारा खेळाडू सामने सचिन तेंडुलकर आहे. सचिनने त्याच्या करिअरमध्ये 463 वनडे सामने खेळले आहेत. त्याच्याशिवाय या यादीत एम. एस धोनी (350), राहुल द्रविड (344) मोहम्मद अजहरुद्दीन (334) सौरभ गांगुली (311) आणि युवराज सिंग (304) सामने खेळले आहेत.
हेही वाचा
“क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता! भारताचा सेमीफायनलचा प्रतिस्पर्धी कोण?”
अश्विनच्या जीवनातील भयानक प्रसंग! ज्यामुळे स्टार स्पिनर हादरला जाणून घ्या एका क्लिकवर
पाकिस्तानकडून भारतीय संघाला जबरदस्त टोला, माजी खेळाडूने दिले खुले आव्हान!