नवी दिल्ली | भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध नसला तरी एक समालोचक म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आकाश चोप्राने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कमी सामने खेळले आहेत. परंतु देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कारकीर्द खूप मोठी आहे. तथापि, तो आता पूर्णवेळ समालोचन करतो. हिंदी समालोचक म्हणून तो भारतात खूप प्रसिद्ध आहे. आता त्याने स्वतःच्याच फलंदाजीवर समालोचन केले आहे.
वास्तविक, चाहत्यांनी आकाश चोप्राकडे त्याच्या फलंदाजीवर समालोचन करण्याची मागणी केली होती. त्याने चाहत्यांनी केलेली ही विनंती मान्य केली आणि आपल्या फलंदाजीच्या व्हिडिओवर समालोचन केले. हा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तो बाद होता होता बऱ्याचवेळा वाचला.
या व्हिडिओत दिसते की ब्रेटलीने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर तो बाद होता होता वाचला, परंतु दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. तथापि, ब्रेट लीच्या ज्या चेंडूवर आकाश बाद झाला तो एक नो बॉल होता, त्यामुळे आकाशला जीवदान मिळाले. त्यानंतर तिसर्या चेंडूवर स्लिपमध्ये उभा असलेल्या सायमन कॅटिचने त्याचा झेल सोडला. या व्हिडिओमध्ये आपण आकाश चोप्राचे शब्द ऐकू शकतो.
On public demand 😇😂 #AakashVani pic.twitter.com/ojTtA8iwnL
— Aakash Chopra (@cricketaakash) October 15, 2020
या व्हिडिओमध्ये समालोचन करताना आकाश म्हणाला, “आज लॉटरीचे तिकीट काढ मिस्टर चोप्रा कारण आज नाश्त्यात तुम्ही कॉर्नफ्लेक्स नव्हे तर नशीब खाऊन आला आहात.”
आकाश चोपडाने भारतासाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत, परंतु 10 सामन्यांच्या 19 डावांमध्ये त्याला एक शतकही करता आले नाही. त्याला अनेक प्रसंगी संधी मिळाली होती पण तो त्या संधीचा लाभ घेऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे राग आला होता, दिनेश कार्तिकने केला खुलासा
आधी केली संथ खेळी, गोलंदाजानेही मारला गुददा; मग काय… त्याने पाडला षटकारांचा पाऊस
शूटींग अगोदरच बंदीची मागणी!! का होतोय ‘मुरलीधरन’च्या बायोपीकला विरोध?
ट्रेंडिंग लेख –
नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर