---Advertisement---

इंग्लंडची ही खेळाडू म्हणते, अर्जून तेंडूलकरला माझ्या डोक्यावर चेंडू मारायचा आहे

On: बुधवार, जून 17, 2020 4:45 PM
---Advertisement---

इंग्लंड महिला क्रिकेट संघातील एक महत्त्वाची खेळाडू असलेली डॅनिएल वॅटचा इंग्लंडबरोबरच भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. ती स्वत: भारताचा कर्णधार विराट कोहलीची मोठी चाहती आहे. तसेच ती अनेकदा भारतीय क्रिकेटपटूंच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करण्यामुळे चर्चेतही येत असते.

याबरोबरच तिचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाशीही चांगले संबंध आहेत. 29 वर्षीय डॅनिएल आणि सचिनचा मुलगा अर्जून यांच्यातही चांगली मैत्री आहे. याबद्दल तिने cricket.com ला दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले आहे. तीने सांगितले की ती 10-11 वर्षांपूर्वी तेंडुलकर कुटुंबाला भेटली होती.

वॅट म्हणाली, ‘मी पहिल्यांदा सचिन आणि अर्जूनला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भेटले होते. कदाचित 2009 किंवा 2010 ला, तेव्हा मी एमसीसी युवा क्रिकेटपटूंसमवेत होते. ते नेट्समध्ये सराव करत होते. खरंच मी नेट्सकडे गेले आणि हॅलो म्हणाले आणि मी डॅनी वगैरे आहे असे सांगून स्वतःची ओळख करून दिली.’

‘अर्जून तेव्हा 10 वर्षांचा वैगरे असेल. तो खूप लहान होता. गुगलवर कुठे तरी फोटो असेल. मी त्याला गोलंदाजी केली. तो खूप चांगला खेळला. तेव्हापासून जेव्हा पण मी सचिन किंवा अर्जूनला भेटते किंवा ते जेव्हा लॉर्ड्सवर सरावाला येतात तेव्हा मी अर्जूनला नवीन चेंडूने माझ्याविरुद्ध गोलंदाजी करायला सांगते.’

वॅटने पुढे सांगताना हे देखील मान्य केले की अर्जूनने त्याच्या वेगात प्रगती केली असून आता त्याचा सामना करणे कठिण जाते. ‘आता तो खूप वेगात गोलंदाजी करतो. तो नेहमी म्हणतो मी चेंडूला उसळी देईल आणि तूझ्या डोक्यावर चेंडू मारेल. त्यामुळे आता मला त्याच्या गोलंदाजीचा सामना करायला आवडत नाही.’

वॅट म्हणाली, ‘त्यांचे छान कुटुंब आहे. अर्जूनची आई देखील प्रेमळ आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकावेळी मी सचिनला भेटले होते. त्यांना कधीही भेटणे छानच असते.’

ट्रेंडिंग घडामोडी – 

नेपोटिझमच्या झळा आता क्रिकेटमध्येही, प्रणव धनावडेला संधी न मिळाल्याने अर्जून तेंडूलकरवर नेटिझन्सचा निशाना

मोठी बातमी: टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये नाही जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

आणि रोहित म्हणाला, ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनल्यानंतर मी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---