मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा २४ सप्टेंबर रोजी आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात घेतले होते परंतु, त्याला अजुनपर्यंत आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. त्याच्या चाहत्यांना अशी आशा आहे की, लवकरच तो या संघासाठी पदार्पण करेल. सध्या आपल्या लूक्समुळे चर्चेत असणारा अर्जुन हा लहानपणी खूप क्यूट होता. चला तर जाणून घेऊया त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या बालपणीचे काही मजेशीर किस्से.
अर्जुन तेंडुलकरचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता.सचिन तेंडुलकर भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.त्यामुळे सचिनचा मुलगा असल्यामुळे अर्जुन देखील लोकप्रिय आहे. वडील क्रिकेटपटू असल्यामुळे अर्जुनने ही लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचे स्वप्नं पहिले होते. तसेच सचिनला देखील वाटत होते की, त्याने एक महान क्रिकेटपटू व्हावे. त्यामुळे अर्जुनने वयाच्या ८ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
अर्जुनमुळे सचिनची मान झुकली होती खाली
अर्जुन तेंडुलकर लहानपणापासूनच खूप क्यूट आहे.परंतु त्याने लहान असताना असे काही कृत्य केले होते,ज्यामुळे सचिनची मान झुकली होती.सचिनने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. तर झाले असे होते की, सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीच्या शूटसाठी एकत्र आले होते. त्यावेळी अर्जुन सचिनच्या मांडीवर बसून मोसंबी खात होता. मोसंबी खाऊन झाल्यानंतर तो उठला आणि समोर बसलेल्या बच्चन यांच्या कुर्त्याला जाऊन हात पुसला. हा प्रकार पाहून सचिन आणि बच्चन दोघेही आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळी सचिनची मान झुकली होती. परंतु, अर्जुन लहान असल्याने दोघांनी ही गोष्ट जास्त ताणली नाही. परंतु सचिन अजूनही या गोष्टीचा उल्लेख करत असतो.
अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरने चित्रपटात देखील काम केले आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला सचिनचा आत्मचरित्रपर चित्रपट, ‘सचिन अ बिलियन ड्रिम्स’ खूप गाजला होता. या चित्रपटात अर्जुनने युवा सचिन तेंडुलकरची भूमिका पार पडली होती. तसेच क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याउलट अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताचा फलंदाज आहे. तसेच तो उत्कृष्ट गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहे.
गेली काही वर्षे मेहनत घेतल्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्याची मुंबई इंडियन्स संघात निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाने त्याला २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.त्याची निवड झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. परंतु, बहिण सारा तेंडुलकरने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तिने फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘हा तुझा हक्क आहे जो तुझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही. मला तुझ्यावर अभिमान आहे..’
अर्जुनने अजूनही प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळलेले नाही. याने खचून न जाता तो आता मुंबईनंतर गोव्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळणार आहे. यासाठी तो भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग यांच्यासोबत चंडीगडच्या क्रिकेट ऍकॅडमीमध्ये सराव करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ
श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला अन् इतिहास घडला, वाचा भारताच्या पहिल्यावहिल्या टी20 विश्वचषकाची कहाणी