येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात टी२० क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्याकारणामुळे आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. परंतु यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता २ आठवड्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सरावासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. अशातच संघातील खेळाडू एकत्र जमायलाही सुरुवात झाली आहे.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. या आयपीएल हंगामात मुंबई संघ सलग तिसरे जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये असणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्मा राष्ट्रीय कर्तृत्व बजावत असताना संघातील इतर खेळाडूंनी संघात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाखाच्या मूळ किमतीत खरेदी केलेला अर्जुन तेंडुलकर हा देखील संघासोबत जोडला गेला आहे.
यापूर्वी देखील तो मुंबई इंडियन्स संघाच्या सराव शिबीरमध्ये उपस्थित असायचा परंतु तो आता संघातील एक सदस्य म्हणून हजेरी लावत आहे. यासोबतच इशान किशनने देखील मुंबई इंडियन्स संघाच्या सराव शिबीरात हजेरी लावली आहे. याबाबतची माहिती मुंबई इंडियन्स संघाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती.
🧳✅#OneFamily #MumbaiIndians @ishankishan51 @iamanmolpreet28 @MarriottBonvoy pic.twitter.com/SNDBsoJ5vz
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2021
हे खेळाडू आयपीएल स्पर्धेदरम्यान बायो बबलमध्ये असणार आहेत. तसेच विलग्नवासाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना सराव करता येणार आहे. अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. जर संधी मिळाली तर, त्याच्याकडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आयपीएल २०२१ साठी मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कूल्टर नाइल, पियूष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम आणि अर्जुन तेंडुलकर.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या फलंदाजााला विराटकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट
मराठीत माहिती- क्रिकेटर केदार जाधव
चेन्नई टू मुंबई! थालाची सीएसके महाराष्ट्राच्या राजधानीत, रैनाचेही मुंबईत आगमन