भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला या दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाच्या आधीपासून अर्जुन त्याठिकाणी आहे आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डेनियल वॅटची त्याने भेट घेतली आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या इंग्लंडमध्ये मजा करत आहे. अर्जुनशी संबंधित एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंग्लंडच्या महिला संघाची खेळाडू डॅनियल वॅट (Daniel Watt) हिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तो स्वतः दिसत आहे. इंस्टा स्टोरीमध्ये दिसत असलेला अर्जुन तेंडुलकर डॅनियल वॅटसोबत जेवणाचा आनंद घेतला आहे. लंडनच्या सोहो रेस्टॉरंटमध्ये डॅनियल आणि अर्जुन जेवणासाठी गेले होते. यामुळे अर्जुनची आणि डॅनियलच्या नात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.