---Advertisement---

अर्जून तेंडूलकरची मोठी निराशा, नाही मिळणार द्रविड मास्तरांचे मार्गदर्शन

On: शुक्रवार, जून 8, 2018 3:32 PM
---Advertisement---

भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेविरूद्ध 2 चारदिवसीय आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेऴणार आहे.

मास्टर ब्लॅस्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जूनची काल श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या अंडर-19 भारतीय संघात निवड झाली आहे.

अर्जूनला चारदिवसीय सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे.

युवा संघाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्यावर या काळात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय ‘अ’  संघाची जबाबदारी असल्याने अर्जूनला राहूल द्रविड यांच्या मार्गदर्शनाला मुकावे लागणार आहे.

मार्च महिन्यात झालेल्या विश्वचषकात राहूल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर-19 संघाने विजेतेपद मिळवले होते. याच विश्वविजेत्या संघातील पृथ्वा शाॅ आणि शुभमन गिल या खेळाडूंनी पुढे आयपीएलमध्ये चांगली कामगीरी केली होती.

या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीचे श्रेय राहूल द्रविड यांना दिले होते. राहूल द्रविड यांच्या मार्गदशनाचा यांना खूप फायदा झाला होता. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन ज्या खेळाडूबरोबर कित्येत वर्ष खेळला त्या राहुल द्रविडचे अर्जूनला मार्गदर्शन मिळेल असे वाटत होते. परंतु राहुलने मार्गदर्शन मिळणार नसल्यामुळे अर्जूनला मात्र याला मुकावे लागणार आहे.

सध्या राहुल द्रविडचा मुलगाही कर्नाटक राज्य क्रिकेट असोशियनशच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. यावर्षाच्या सुरुवातीलाच त्याने १५० धावांची मोठी खेळी केली होती.

राहूल द्रविड हे भारतीय  ‘अ’ आणि अंडर-19 या दोन्ही संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ड्ब्लू व्ही रमण यांच्याकडे श्रीलंकेला जाणाऱ्या संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सोेपवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment