भारतात सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अर्जुन सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या डॉ. के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत खेळतोय. जिथे त्याने गोव्याकडून खेळताना केएससीए 11 विरुद्ध जबरदस्त कामगिरी नोंदवली. या लाल चेंडूच्या स्पर्धेत अर्जुनने शानदार गोलंदाजी करत गोव्याला एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुन तेंडुलकरने गोवा संघासाठी सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने पाच तर दुसऱ्या डावात त्याने चार बळी घेतले.
अर्जुन तेंडुलकरने केएससीए 11 डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे मोडला. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात केवळ 41 धावांत 5 बळी घेतले. अर्जुनने केएससीए 11 च्या पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना बाद केल्या नंतर अक्षन रावची विकेट घेत पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. केएससीए 11 संघाला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, गोवा क्रिकेट असोसिएशन संघाने पहिल्या डावात 413 धावांची मोठी मजल मारली. अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली.तर, मंथन खुटकरने 69 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. अर्जुन तेंडुलकरने 18 धावांचे योगदान दिले.
यानंतर अर्जुनने दुसऱ्या डावात गोलंदाजीतील उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली. यावेळी केएससीए 11 संघ अवघ्या 121 धावांत गारद झाला. अर्जुनने दुसऱ्या डावात 55 धावांत 4 बळी घेतले. अशाप्रकारे अर्जुनने एकूण 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या. अर्जुनने त्याच्या कामगिरीचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
arjun tendulkar 5 wicket hall for goa DR (CAPT) K THIMMAPPIAH MEMORIAL TOURNAMENT – 2024-25 #arjuntendulkar pic.twitter.com/Uv66lbYTJm
— ANOOP DEV (@AnoopCricket) September 16, 2024
अर्जुन तेंडुलकरसाठी पुढील रणजी हंगाम खूप महत्त्वाचा आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो.अर्जुनच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 13 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजीत एका शतकासह 481 धावा बनवल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
सोनी-स्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!
फक्त 58 धावा आणि किंग कोहली रचणार इतिहास! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड धोक्यात