डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाही त्याने चांगला खेळ दाखवला.सध्या अर्शदीप ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी मोठा दावेदार मानला जात आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा हा गोलंदाज कठीण परिस्थितीतही गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
अर्शदीपच्या चाहत्यांमध्ये भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांचाही समावेश आहे. विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दावेदारांमध्ये अर्शदीपने अवेश खानला मागे टाकले आहे, असे मांजरेकरांचे मत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाण्याची शर्यत रोचक होत आहे. आणि इथे मला वाटतं अर्शदीप सिंगने आवेश खानला मागे टाकलं आहे. आवेश खान थोडा मागे आहे आणि तेच माझ्यासाठी मनोरंजक आहे. तुम्हाला कळेल की खेळाची खरी लढाई सुरू आहे. अर्शदीप सिंगने आवेश खानवर आघाडी घेतली आहे.त्यामुळे पुढच्या काळात आवेशआधी भारतीय संघात अर्शदप आपली जागा पक्की करेल याची मला खात्री आहे.”
अर्शदीपने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या लाईन आणि लेंथवर नियंत्रण ठेवून त्याने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या यॉर्कर्सचे खूप कौतुक केले जाते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत, ज्यामध्ये भारताने ४-१ ने विजय मिळविला, त्याला मालिका सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. शिवाय आगामी आशिया चषकातही अर्शदीप सिंगची अनेक दिग्गज गोलंदाजांआधी निवड करण्यात आली. अशा परिस्थितीत अर्शदीप सिंग आगामी काळात भारतासाठी एक प्रमुख गोलंदाजाची भुमिका बजावू शकतो असे अनेक दिग्गजांचे मत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी खेळाडू म्हणतोय, “राहुलला थेट आशिया कपमध्ये संधी देणे अयोग्य”
Asia Cup | यूएईत भारत नक्कीच बनू शकतो चॅम्पियन! मागच्या ३८ वर्षात कुणीच नाही दिली टक्कर
पाचव्या टी-२०त विश्रांती घेतल्यामुळे सूर्यकुमारला झटका! आयसीसी क्रमवारीत पॉईंट्सने केला घात